arest (फोटो सौजन्य - pinterest)
१७ वर्षीय पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. फोडलेल्या बियरचा बाटलीने ३६ वेळा वार करून आरोपी पत्नीने काटा काढला. प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून करण्यात आल्याचा समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपुरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी प्रियकर, पत्नी आणि दोन मित्रांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी मुलीच्या कुटुंबीयांविरुद्ध बालविवाहाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यताही पोलीस तपासत आहेत.
राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ; भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले
१३ एप्रिल रोजी एका तरुणाचा मृतदेह इंदूर-इच्छापूर महामार्गावरील बुऱ्हाणपुरमधील आयटीआय कॉलेजजवळील झुडपात आढळला होता. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर राहुल कुमार उर्फ राजेंद्र पांडे याचा मृतदेह असल्याचे समोर आले. मृतदेह सापडण्याच्या एक दिवसआधी राहुल कुमार त्याच्या पत्नीसोबत खरेदीसाठी गेला होता. तसेच यानंतर आरोपी पत्नी देखील बेपत्ता होती. त्यामुळे पोलिसांनी या अँगलने तपास सुरु केला.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगी आणि तिचा प्रियकर युवराज पाटीलने मिळून राहुल कुमारचा काटा काढण्याचे ठरवले होते. हे दोघेही खरेदी करायला गेले होते. खरेदी केल्यानंतर व एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बाईकवरून घरी परतत होते. यावेळी अल्पवयीन पत्नीने चप्पल खाली पडल्याचा बहाणा करीत पाटील दुचाकी रोखण्यास सांगितले. त्याने वाहन रोकताच तिचा प्रियकर युवराजच्या दोन मित्रांनी त्याला घेरले आणि राहुलला मारहाण करण्यास सुरवात केली. फोडलेल्या बियरच्या बाटलीने ३६ वेळा मृत राहुलवर वार केले. आरोपी पत्नीनेही राहुलवर हल्ला केला. यावेळी त्याचा जागीच मृत्य झाला.
हत्येनंतर प्रियकराला व्हिडीओ कॉल करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पतीचा मृतदेह दाखवला आणि ‘काम हो गया’ असं सांगितलं. पाटील खरेदीच्या बहाण्यानं घराबाहेर नेऊन निर्मनुष्य ठिकाणी हत्या केली. यानंतर चारही आरोपी ट्रेनने इंदूरला पळून गेले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन डेटा वापरून आरोपींचा शोधून काढलं आणि त्यांना इंदूरमधील सनवेर येथून अटक केली.