बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी
सिन्नर पाठोपाठ मनमाडमध्ये १ हजार १६१, नांदगावात १ हजार १५, मालेगाव तालुक्यात ९३८, सटाणामध्ये ९२३, चांदवडमध्ये ७७४, ओझरमध्ये ७४९ गुन्हे नोंद आहेत. यासह वडनेर ५४४, दिंडोरीत ५३६, वावीत ४६९, खाकुर्डीत ७२५, इगतपुरीत ६२७, येवला घोटीत ४६२, वणीत ४४१ गुन्हे नोंद तालुक्यात ५७५, सिन्नर एमआयडीसीत आहेत.
दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर व तेगबीर संधू यानी पथकांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार वर्षभर विविध ठिकाणी धाडसी स्वरुपाच्या कारवाया करण्यात आल्या. ग्रामीण भागातील हातभट्टचा उद्धवस्त करण्यासाठी महिला पोलिसांच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, याच स्वरुपाची कारवाई सन २०२६ मध्येही सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार संबंधित ठाण्यांसह विभागांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी नियोजन केले.
याचदरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिक-पुणे रस्त्यावरील बोधलेनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. साई मंदिरातून आणलेल्या प्रसादावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक भांडणात झाले, ज्यामुळे धाकट्या भावाने त्याच्या मोठ्या भावाला लाकडी काठीने मारहाण करून ठार मारले. या घटनेमुळे कुटुंबातील आई आणि बहिणीवर मोठे दुःख ओढवले आहे. तक्रारीनुसार, ८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन्ही भावांमध्ये भांडण सुरू झाले. परिसरातील स्प्रिंग व्हॅली सोसायटीजवळील साई मंदिरात प्रसाद आयोजित केला जात होता. योगेश दत्ता बोरसे (३२) तिथून घरी प्रसाद घेऊन आला होता. तो प्रसाद खाण्यासाठी बसताच त्याचा धाकटा भाऊ सनी दत्ता बोरसे (३०) याने प्रसादाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर शारीरिक हाणामारीत झाले.






