जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! (Photo Credit- X)
आरोपी शेख अमजद याच्या शोधासाठी हर्सल पोलिस ठाण्याचे डीबीचे एक पथक आणि गुन्हे शाखेचे एक पथक असे दोन पथक शोध घेत आहेत. आरोपी हा बीडला असण्याची शक्यता सुऱ्यांनी वर्तविली होती, त्यानुसार एक पथक बीडला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शेख अमजद रविवारी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास कारागृहाच्या परिसरातून अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ तो नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी न दिसल्याने कारागृह अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, तो कुठेही आढळून न आल्याने अखेर त्याच्या पलायनाची खात्री झाली.
प्रकरणात हसुल येथील मध्यवर्ती कारागृहाचे साजिद खान नन्हेखान (४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अमजद हा २०१८ साली घडलेल्या एका खून प्रकरणातील दोषी असून, त्या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो सुरुवातीला अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. जुलै २०२४ मध्ये त्याची बदली हसूल कारागृहात करण्यात आली. कारागृहातील वर्तन समाधानकारक असल्याच्या अहवालानंतर त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले.
संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेला कैदी खुल्या कारागृहातून फरार होणे, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. कैद्याच्या हालचालींवर योग्य देखरेख होती का, सुरक्षा यंत्रणा पुरेशी सक्षम होती का, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणामुळे खुल्या कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा संशयाची छाया पसरली असून, वरिष्ठ स्तरावर चौकशी होण्याची शक्यता आहे.
८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.२० वाजता झाडू कामाकरिता कैदी अमजद शेख याच्यासह ११ बंदी कारागृहाच्या कवायत मैदानावर कामासाठी गेले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास सर्व बंदी कामावरून परतल्यानंतर अंघोळीसाठीहौदाकडे गेले. हौदावर आंघोळ करत असताना शेख अमजद आणि कैदी राजू विश्वनाथ याच्याशी आरोपी शेख अमजदचा वाद झाला होता. शेख अमजद याने राजू जाधव याच्या डोक्यात दगड मारुन त्याचे डोके फोडले. राजू जाधव रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्याने त्यास कारागृहातील दवाखान्यात नेण्यात आले. या गोंधळाचा फायदा घेत त्याने पलायन केले.
Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल






