Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime News: जेऊरला २०० किलो गोमांस पकडले, एमआयडीसी पोलिसांचा छापा; धार्मिक स्थळाशेजारी कत्तलखाने

राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतानाही गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आला. कत्तलीसाठी लागणारे साहित्य तसेच २०० किलो गोमांस सदर ठिकाणी मिळून आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 24, 2025 | 04:08 PM
जेऊरला २०० किलो गोमांस पकडले, एमआयडीसी पोलिसांचा छापा; धार्मिक स्थळाशेजारी कत्तलखाने

जेऊरला २०० किलो गोमांस पकडले, एमआयडीसी पोलिसांचा छापा; धार्मिक स्थळाशेजारी कत्तलखाने

Follow Us
Close
Follow Us:
  • जेऊरला २०० किलो गोमांस पकडले
  • एमआयडीसी पोलिसांचा छापा
  • धार्मिक स्थळाशेजारी कत्तलखाने
Crime News In Marathi: अहिल्यानगरनगर तालुक्यातील जेऊर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करून विक्री करणाऱ्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. टाकलेल्या छाप्यात २०० किलो गोमांस व आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिसांच्या वतीने गौवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या धडक कामगिरीचे जेऊर पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. सहा. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की जेकर गावात मुनीर खैरू शेख हा गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करत आहे.

नात्यातील मुलाकडून साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गावकऱ्यांनी गुन्हा दडपण्याचा केला प्रयत्न

मिळालेल्या माहितीवरून तात्काळ जेऊर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंडे, पोहेकॉ. सुशांत दिवटे, आजिनाथ पालवे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तांदळे यांनी घटनास्थळी जाऊन मुनीर खैरू शेख याच्या घरावर छापा टाकला. सदर ठिकाणी मोहसीन मुश्ताक शेख (रा. भिंगारकॅम्प, अहिल्यानगर) हा राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतानाही गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आला. कत्तलीसाठी लागणारे साहित्य तसेच २०० किलो गोमांस सदर ठिकाणी मिळून आले.

कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करावेत

मोहसीन शेख यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल हा मुनीर सौरु शेख (रा. जेऊर बायजाबाई ता. जि. अहिल्यानगर) याच्या मालकीचा असले बाबत माहिती दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून धार्मिक स्थळा शेजारी सुरू असणाऱ्या गोवंशीय जनावरांचे कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी

जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराच्या पायथ्याशी अवैधपणे गोवगीय जनावरांची कत्तल करण्यात येत असल्याचा होता,
त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील होत होती. धार्मिक स्थळा शेजारीच गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याने नागरिकामधून नानाजी देखील व्यक्त केली जात होती. आजच्या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तसेथ कारवाई मध्ये सातत्य ठेवण्याची मागणी ही नागरिक करत आहेत.

पोलिसांच्या कारवाईचे ग्रामस्थांकडून कौतुक

एमआयडीसी पोलिसांनी गोवंशीय जनावरांच्या कत्तलीविरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. वारंवार गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंडे, आदिनाथ पालवे, सुशांत दिवटे, ज्ञानेश्वर तांदळे, शुभम सुटुक, सुरज देशमुख यांच्या पथकाने केली.

Crime News: रात्रीस दरोडा पडे! राजापूरमधील ‘या’ गावात 6 जणांची टोळी थेट घरात घुसली अन्…

Web Title: 200 kilos of beef seized in jeur midc police raid slaughterhouses near religious site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Beed Crime: नात्यातील मुलाकडून साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गावकऱ्यांनी गुन्हा दडपण्याचा केला प्रयत्न
1

Beed Crime: नात्यातील मुलाकडून साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गावकऱ्यांनी गुन्हा दडपण्याचा केला प्रयत्न

Nagpur crime: साक्षगंध कार्यक्रमातून उफाळला वाद; जुन्या वैमनस्यातून गोळीबार, एक जखमी
2

Nagpur crime: साक्षगंध कार्यक्रमातून उफाळला वाद; जुन्या वैमनस्यातून गोळीबार, एक जखमी

Delhi Crime: विवाहित महिलेचे दोन प्रियकर… तिसऱ्या तरुणाची एन्ट्री अन् संशयाचे वादळ! कट रचून स्कार्फने गळा आवळून हत्या
3

Delhi Crime: विवाहित महिलेचे दोन प्रियकर… तिसऱ्या तरुणाची एन्ट्री अन् संशयाचे वादळ! कट रचून स्कार्फने गळा आवळून हत्या

Washim Crime: ट्युशन क्लासमध्ये अल्पवयीन मुलावर शिक्षकाने केले अश्लील चाळे,  POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
4

Washim Crime: ट्युशन क्लासमध्ये अल्पवयीन मुलावर शिक्षकाने केले अश्लील चाळे, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.