मांडी, छातीवर डागली गोळी
आरोपी देवा उर्फ परमेश्वर एकनाथने बाल्या गुजर याच्या मांडी व छातीवर गोळ्या झाडल्या. ४ महिन्यांपूर्वी बाल्याने देवाचे अपहरण केल्याची माहिती आहे, त्या वादातूनच हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोळीबारानंतर निर्माण झालेल्या गोंधळात बाल्याचा भाऊ सुनील गुजर, मुकश मापूर आणि अन्य काही पाहुणेही जखमी झाले, यातील जखमी बाल्याला मेडिकलमध्ये तर इतरांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये हितेश बन्सोड यांनी दाखल केले.
बंदूक आणली कुठून?
ही घटना नियोजित असल्याचे दिसते. आधी वाद, त्यानंतर जुने प्रकरण उकरून काढत वचपा काढण्याचा हा प्रकार आहे. मात्र, या घटनेत वापरलेली बंदूक किंवा त्यासदृश शस्त्र आरोपीनी आणले कुठून ? असा प्रश्न आहे. ग्रामीण भागात गत काही दिवसात गुन्हेगारांकडून घातक शस्त्रांचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील लोन ग्रामीण भागात वायूवेगाने पसरत असल्याने चिताही व्यक्त केली जात आहे.पोलिस प्रशासनाची धावाधाव गोळीबाराच्या घटनेनंतर ग्रामीण पोलिसात धावाधाव झाली. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय अधिकारी सागर खर्डे, तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली.
Ans: कळमेश्वर
Ans: बाल्या
Ans: ७






