२६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ (फोटो सौजन्य-X)
26/11 terror attack news in marathi: २६/११ चा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याने मुंबई गुन्हे शाखेसमोर धक्कादायक खुलासे केले आहेत. पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होता आणि २००८ च्या हल्ल्यादरम्यान मुंबईत होता,अशी धक्कादायक माहिती तहव्वुर राणा यांने पोलिसांनी दिली. तसेच कबूल केले की त्याचा मित्र आणि सहकारी डेव्हिड हेडलीने अनेक वेळा लष्कर-ए-तोयबासाठी प्रशिक्षण घेतले होते. तसेच अधिकाऱ्यांना सांगितले की, मुंबईत त्याच्या फर्मचे इमिग्रेशन सेंटर उघडण्याची कल्पना त्याची स्वतःची होती आणि त्यातील आर्थिक व्यवहार देखील व्यवसाय खर्च म्हणून केले गेले होते. त्याने असेही कबूल केले की तो २६/११ च्या हत्याकांडाच्या वेळी मुंबईत उपस्थित होता आणि तो दहशतवाद्यांच्या नियोजनाचा भाग होता. याचदरम्यान आता दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातील एनआयए विशेष न्यायालयाने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली.
दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातील एनआयए विशेष न्यायालयाने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि आरोपी तहव्वुर राणाची न्यायालयीन कोठडी १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. राणा मागील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) राणा यांच्यावरील दहशतवादाच्या गंभीर आरोपांची चौकशी करत आहे. एनआयएने पटियाला हाऊस कोर्टात तहव्वुर हुसेन राणा यांच्याविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात राणाच्या भूमिकेबाबत नवीन तथ्ये आणि खुलासे नमूद केले आहेत.
न्यायालयाने पुरवणी आरोपपत्राच्या विचारासाठी १३ ऑगस्ट २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. एनआयएच्या आरोपपत्रात राणाचा पाकिस्तानी सैन्य आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांशी कट रचण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट केले आहे.
तहव्वुर राणाने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ज्यामध्ये त्याने नियमित अंतराने त्याच्या कुटुंबाशी फोनवर बोलण्याची परवानगी मागितली आहे. एनआयए न्यायालय १५ जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी करणार आहे. हुसेन राणाने चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाने या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थांचा सहभाग असल्याचे कबूल केले आहे. २६/११ च्या हल्ल्यादरम्यान तो मुंबईत उपस्थित होता आणि हे सर्व एका मोठ्या कटाचा भाग होता, अशी कबुलीही त्याने दिली आहे.
तहव्वुर राणा सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आहे. २६/११ च्या हल्ल्याशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याची चौकशी सुरू आहे, ज्यामध्ये १६६ लोक मारले गेले होते आणि शेकडो जखमी झाले होते.
मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीदरम्यान, राणाने स्वतःला पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट म्हणून वर्णन केले. त्याने सांगितले की तो स्वतः हल्ल्याच्या वेळी मुंबईत उपस्थित होता आणि तेथे त्याची उपस्थिती हल्ल्याच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता. राणाने लष्कर-ए-तैयबाकडून प्रशिक्षण घेतल्याचेही कबूल केले आहे. त्याने सांगितले की त्याने अमेरिकेत तुरुंगात असलेल्या दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीकडून पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. दोघांनीही दहशतवादी छावण्यांमध्ये एकत्र भाग घेतला होता आणि मुंबई हल्ल्याच्या कटात एकत्र काम केले होते.