सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत अल्पवयीन संशयितासह चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख 73 हजार रुपये किमतीचे 928 नशेच्या पोलिसांनी ही कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली आहे.
पुढे असलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर, अब्दुलरझाक अब्दुलरहीमान शेख, उमरफराज राजू शेख आणि एक अल्पवयीन अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चौगघांना छापा टाकून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून1 लाख 73 हजार रुपयेकिमतीच्या नशेच्या गोळ्या आणि गांजा जप्त करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
मिरज शहरातील महात्मा गांधी चौक ते कुपवाड रस्त्यावर एका हॉटेल जवळ दोघेजण नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार केले. या पथकाने महात्मागांधी चौक येथे सापळा लावला असता त्यांना दोघे संशयित चालत येतांना दिसले. त्यांच्या पाठोपाठ दोघेजण दुचाकीवरून येऊन त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या सुपूर्त केल्या. चौघांवर पथकाने छापा टाकून यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ७३ हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या
बार्शी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच बार्शीत मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बैल विकून आलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केला.
रावण सोपान खुरंगुळे (वय ७०, रा. वाणेवाडी) असे खून झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. अनंतराव उर्फ अनिल रावण खुरंगुळे असे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिस पाटील राहुल लोखंडे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रावण सोपान खुरंगुळे यांनी बाजारात बैल विकले होते. त्याचे आलेले पैसे मुलगा अनंतराव याने मागितले. पण, पैसे न दिल्याने अनंतराव वडील रावण खुरंगुळे यांना रात्री काठीने व पोतराजाच्या वाकीने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत तालुका पोलिस ठाण्यात मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे करत आहेत. या अशा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काठीने बेदम मारहाण
काठीने व पोतराजाच्या वाकीने बेदम मारहाण करून खून केला. तालुक्यातील वानेवाडी येथे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी उघडकीस ही घटना आली. घटनास्थळाची सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी पाहणी केली.
Akola Crime: अकोला हरदरलं ! गतिमंद अल्पवयीन मुलीचा चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार