Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांना सांभाळा! ‘या’ राज्यात अपहरणाच्या संख्येत वाढ; पालकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

ग्रामीण तसेच शहरी भागात अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, क्रीडांगणे, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलांची सुरक्षितता हा ऐरणीवर आलेला प्रश्न बनला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 26, 2025 | 11:35 AM
लहान मुलांना सांभाळा! 'या' राज्यात अपहरणाच्या संख्येत वाढ; पालकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

लहान मुलांना सांभाळा! 'या' राज्यात अपहरणाच्या संख्येत वाढ; पालकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

Follow Us
Close
Follow Us:

 २०२५ दरम्यान रायगड जिल्ह्यात ४१ मुले बेपत्ता
अल्पवयीन मलाच्या अपहरणांत वाढ
पालकांमध्ये निर्माण झाले भीतीचे वातावरण

भारत रांजणकर/अलिबाग: रायगड जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत १८ वर्षांखालील मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण ४१ अल्पवयीन मुलांच्या अपहरणाची नोंद झाली असून ही बाब पालक, समाज आणि प्रशासनासाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सवाधिक ८ अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. त्यानंतर पेण (६), रसायनी (४), खोपोली (४), माणगाव (३), अलिबाग (३) आणि महाड एमआयडीसी (३) या भागांमध्येही अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडल्याचे स्पष्ट होते. नेरळ येथे २ तर खालापूर, रेवदंडा, मुरूड, रोहा, पोयनाड, वडखळ, दादर सागरी आणि महाड शहर येथे प्रत्येकी १ अपहरणाची नोंद आहे.

पालकांमध्ये भीती

ग्रामीण तसेच शहरी भागात अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, क्रीडांगणे, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलांची सुरक्षितता हा ऐरणीवर आलेला प्रश्न बनला आहे. काही प्रकरणांमध्ये अपहृत मुले सुखरूप सापडली असली तरी काही घटनांचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

प्रशासनासाठी गंभीर इशारा
या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शाळा व पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्तींबाबत सतर्कता बाळगणे, तसेच पोलिसांनी गस्त वाढवणे, सीसीटीव्ही यंत्रणा बळकट करणे व जनजागृती मोहिमा राबवणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलांच्या अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांवर वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ही आकडेवारी प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.

Web Title: 41 child trafficking cases in raigad district fear in parents mind crimen news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • child trafficking
  • crime news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Kokan Railway मधून प्रवास करताय? मग ‘ही’ बातमी नक्की वाचाच; गेल्या सात महिन्यांत…
1

Kokan Railway मधून प्रवास करताय? मग ‘ही’ बातमी नक्की वाचाच; गेल्या सात महिन्यांत…

स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; ‘या’ ठिकाणी घडला अपघात
2

स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; ‘या’ ठिकाणी घडला अपघात

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम
3

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Crime News: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ५६ लाखांची फसवणूक; 28 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
4

Crime News: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ५६ लाखांची फसवणूक; 28 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.