मुंबई : गोवंडी परिसरात असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातून (Girls Hostel) स्वच्छतागृहाची खिडकी आणि ग्रील तोडून सहा मुली पळाल्याची घटना घडली. काल पहाटेच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना ही घटना घडली.
धक्कादायक बाब म्हणजे, या अल्पवयीन मुलींनी पळून जाण्यापूर्वी गार्ड कॉन्स्टेबलच्या (Guard Constable) खोलीचे गेट बाहेरून बंद केले होते. याचे या मुलींच्या पलायनाची (Escape) माहिती कॉन्स्टेबलली मिळाली असतील तर सदर मुलींचा पाठलाग करून पकडले असते.
वसतिगृहात येथे राहणाऱ्या प्रत्येक महिलेची नोंद केली जाते आणि रेकॉर्डनुसार (Record) ६ मुली बेपत्ता (Missing) असल्याचे दिसून आले, तेव्हा वसतिगृहातील कोणत्या मुलींनी पलायन हे समजण्यास मदत झाली. याबाबत कळताच वसतिगृहातील अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गोवंडी पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित मुलींचा शोध सुरू आहे. विविध तपास यंत्रणांकडून मानवी तस्करी, भिकारी अशा बेकायदेशीर कामे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते आणि तेथे सापडलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका करून गोवंडीच्या वसतिगृहात ठेवण्यात येते.