
खळबळजनक ! बीडमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; कोर्टाने नराधमाला सुनावली 'ही' शिक्षा
बीड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता बीडमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
सुंदर निवृत्ती तायड (वय ३४, रा. रामपुरी ता. गेवराई, जि. बीड) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी याच्याविरुद्ध गुन्ह्याचे दोषारोप पत्र सत्र न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आलेले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपत्रातील सर्व साक्षीदार तसेच तपास कामी गोळा केलेले सर्व पुरावे यावरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुंदर निवृत्ती तायड याला बीड येथील सत्र न्यायालयाने २० वर्ष कारवास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
हेदेखील वाचा : Bihar Crime : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; तरुणीचे अपहरण, जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले, नंतर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार
तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील रामपुरी येथे ४ मे २०२२ रोजी सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार प्रकरणी तलवाडा पोलिस स्टेशन येथे लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षणासह विविध कलमांन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड सत्र न्यायालायत दोषारोपपत्र
सदर गुन्ह्याचा तपास पिंक पथकाकडील महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी केला होता. त्यांना मदतनीस म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार भगवान खाडे, पोलिस हवालदार महेश झिकरे, महिला पोलीस अंमलदार ज्योती साळुंखे या टीमने मदत केली होती. सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध गुन्ह्याचे दोषारोप पत्र सत्र न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आलेले होते. या गुन्ह्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार गव्हाणे यांनी मोलाची कामगिरी केली आहे. चिमुकलीवर बलात्कार प्रकरणी अखेर पोलिसांनी केलेल्या तपासाला यश मिळाले.
हेदेखील वाचा : Delhi Crime : 48 तास, 9000 पोलीस आणि 4299 ठिकाणी छापेमारी, दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट सुरू