Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार

संशयित निलेश गडदे याच्यावर यापूर्वीही खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून, तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर शहरात प्रवेशबंदी असतानाही तो साथीदारांसह सांगलीत पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2026 | 07:47 AM
सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार

सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार

Follow Us
Follow Us:

सांगली : शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांना ठार मारण्यासाठी आलेल्या संशयितांनी ते हाती न लागल्याने त्यांच्या अवघ्या १४ वर्षीय नातवावर गोळी झाडून त्याचा निर्घृण खून केला. या थरारक घटनेमुळे सांगली शहर हादरून गेले असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अभयनगर येथील एसटी कॉलनी परिसरात बुधवारी (दि.10) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत मारुती बंडगर हा घराच्या पोर्चमध्ये मोबाईल पाहत बसला असताना संशयित निलेश गडदे व त्याचे साथीदार तेथे आले. हातात पिस्तूल घेऊन आलेल्या गडदेने बाळासाहेब बंडगर यांचा शोध घेतला. मात्र, ते समोर न आल्याने संतापाच्या भरात त्याने निष्पाप वेदांतवर पिस्तूल रोखून त्याच्या उजव्या डोळ्यात गोळी झाडली. गोळी लागताच वेदांत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

Ahilyanagar Crime : पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट

गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत बाहेर आले. गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. एका निष्पाप बालकाचा गोळी झाडून खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या मालधक्का ठेक्यावरून दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून संशयित गडदे याने संबंधित ठेकेदाराला धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून गडदेने त्यांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे.

खुनाचा गुन्हा यापूर्वीही होता दाखल

विशेष म्हणजे संशयित निलेश गडदे याच्यावर यापूर्वीही खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून, तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर शहरात प्रवेशबंदी असतानाही तो साथीदारांसह सांगलीत पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गुंडाराज संपवण्यासाठी कठोर कारवाई करा

घटनेनंतर संशयित फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. निष्पाप वेदांतच्या मृत्यूने बंडगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “गुंडाराज संपविण्यासाठी कठोर कारवाई करा,” अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: A boy shot dead over contract dispute incident in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 07:47 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा
2

बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

50 हून अधिक तरुणींना त्रास देणारा विकृत जाळ्यात; व्हॉट्सॲप ग्रुपवरून नंबर घेयचा अन्…
3

50 हून अधिक तरुणींना त्रास देणारा विकृत जाळ्यात; व्हॉट्सॲप ग्रुपवरून नंबर घेयचा अन्…

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी
4

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.