Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

बावधन येथील जमीन विकसित करून मिळालेल्या हिस्स्यातील तीन फ्लॅटची विक्री केल्यानंतर सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2026 | 12:41 PM
फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप
  • बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल
  • पोलिसांकडून तपास सुरु
पुणे : राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बावधन येथील जमीन विकसित करून मिळालेल्या हिस्स्यातील तीन फ्लॅटची विक्री केल्यानंतर सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी तुषार गणपत दगडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश हरिभाऊ कुंबरे आणि कांचन रुपेश कुंबरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम *३१६(२), ३१६(५), ३५१(२), ३१८(४) आणि ३(५)* अन्वये १ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एफआयआरनुसार, दगडे कुटुंबीयांच्या बावधन बुद्रुक येथील वडिलोपार्जित जमिनीच्या विकासासाठी २०११ मध्ये संबंधित विकासक कंपनीसोबत करार करण्यात आला होता. या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘आर. के. ग्रेसिया’ इमारतीतील काही फ्लॅट जमीन मालकांच्या वाट्याला आले होते. हे फ्लॅट अधिक दराने विकून देण्याचे आश्वासन देत विकासकांनी कुलमुखत्यारपत्र घेतल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

हे सुद्धा वाचा : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एकत्रित हिस्स्यातील फ्लॅट क्रमांक ३०१, ९०२ आणि ११०२ यांची विक्री करून एकूण ५ कोटी २९ लाख ६१ हजार ३०० रुपये प्राप्त झाले. त्यातील स्वतःच्या वाट्याची २ कोटी ६४ लाख ८० हजार ६५० रुपयांची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रकमेची मागणी केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ केली तसेच जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. हा कथित प्रकार २०११ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र एकनाथ आळेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. एफआयआरमधील आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून पुढील तपास कोथरूड पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका

Web Title: A case has been registered against a builder couple in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
1

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
2

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
3

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
4

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.