Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?

बिलात सवलत मिळावी यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (सीओओ) पिस्तूलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 20, 2026 | 12:30 PM
रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?

रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?

Follow Us
Follow Us:

पुणे : हडपसरमधील नामांकित खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या वैद्यकीय बिलावरून वाद झाला. या वादानंतर मात्र, बिलात सवलत मिळावी यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (सीओओ) पिस्तूलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात विलू पूनावाला रुग्णालयाचे सीओओ डॉ. आर्य लजपतराय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हडपसर पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक उत्तम कांबळे (वय ३३) यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान डॉक्टराकडील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, कांबळे यांचे मित्र राजू खुडे यांच्या आई सुशीला विष्णू खुडे (वय ६०, रा. फुरसुंगी) यांच्यावर विलू पूनावाला रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी (१६ जुलै) उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या उपचारासाठी आतापर्यंत सुमारे २ लाख ४० हजार रुपये भरूनही रुग्णालय प्रशासनाने आणखी २ लाख २३ हजार रुपयांचे बिल भरण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान या बिलात काही सवलत मिळावी, या विनंतीसाठी प्रतीक कांबळे आणि त्यांचे चुलत भाऊ रुग्णालयात गेले होते. त्यावेळी सीओओ डॉ. आर्य लजपतराय यांनी बिलात सवलत देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्राथमिक चौकशीनंतर डॉ. आर्य लजपतराय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेत वापरण्यात आल्याचा आरोप असलेले पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बेशिस्त वाहनचालकांचा कहर! कारवाईचा वेग वाढला, मात्र, बेशिस्ती सुरूच; पाच वर्षात तब्बल…

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेत जमिनीच्या रस्त्याच्या वादातून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याच्या खून केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. गणेश रामभाऊ मरगळे (वय २३), सुनील रामभाऊ मरगळे (वय २०), विजय बाबूराव मरगळे, राजू ज्ञानेश्वर मरगळे (वय १९), राजू रामभाऊ मरगळे (वय २०, सर्व रा.करंजावणे वस्ती, किरकटवाडी, ता. मुळशी, जि. पुणे ) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

Web Title: A case has been registered against the coo of a private hospital in hadapsar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.