Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2026 | 12:01 PM
चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  याप्रकरणी संतोष पंडीत याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया खात्यावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ टाकला होता. ‘जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नेते देत नाहीत पाटील हे त्यापैकी एक आहेत’, असा मजकूर असलेली चित्रफीत व्हायरल करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये अश्लील आणि शिवराळ भाषा वापरून अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्याचे पांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३५६, २९६, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

कोण आहे संतोष पंडित?

संतोष पंडित हे पुणेकर असून सोशल मीडियावर ते व्हिडीओ पोस्ट करुन भुमिका मांडत असतात. रस्ते आणि महापालिकेच्या कारभारावर टीका करणाऱ्यांमध्ये ते अग्रेसर असतात. ते स्वतःचा उल्लेख ‘नागरिक पत्रकार’ असा करतात. रस्त्यांवरील खड्डे आणि अन्य समस्यांवर ते आपल्या पद्धतीने टीका करतात. काही वेळा ते अतिरेक करत असल्याने त्यातून ते अडचणीतही आले आहेत. टिळक रोडवरील ग्राहक पेठेसमोर संगीता तिवारी यांच्या ‘गुलाबो गँग’च्या वतीने भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी वृत्तांकनासाठी काही पत्रकारही उपस्थित होते. तेथून जात असलेल्या संतोष पंडित यांनी ‘तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे,’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी वाहतूक कोंडीचा व्हिडिओ बनवला. तेथे उपस्थित असलेल्या महिला पत्रकार आणि आंदोलनकर्त्या महिलांवर त्यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत टीका करण्यास सुरुवात केली. ‘पत्रकारांमुळे वाहतूक कोंडी होत आहे,’ असे सांगत त्यांनी महिला पत्रकारांच्या कपड्यांवरून शेरेबाजी केली आणि त्यांचे चित्रीकरण सुरू केले. महिला पत्रकारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका महिला पत्रकाराने पर्वती पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

Web Title: A case has been registered against two individuals for making derogatory remarks about chandrakant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
2

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.