Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी बिबवेवाडीत एका मंडळाच्या अध्यक्षांसह लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2026 | 06:08 PM
दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट
  • नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुणे : दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी बिबवेवाडीत एका मंडळाच्या अध्यक्षांसह लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवातील कार्यक्रमात अश्लील नृत्य प्रकारांना बंदी घालण्यात आली होती. कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. ती न पाळल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

याप्रकरणी राधा पाटील (मुंबई), तसेच बिबवेवाडीतील एम्पायर ग्रुपचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर), आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस हवालदार नंदलाल भादले यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवात एम्पायर ग्रुप ए. के. बॉईजचे अध्यक्ष भूषण सोनवणे आणि कार्यकर्त्यांनी राधा पाटील यांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. परवानगी मिळण्यासाठी मंडळाकडून बिबवेवाडी पोलिसांत अर्ज सादर करण्यात आला होता. अर्जांच्या अनुषंगाने राज्यातील कला, लोककला, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र पोलिसांना सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करावा लागतो. कार्यक्रमाचे आयोजक, तसेच लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्याकडून अशा प्रकारची परवानगी मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करण्यात आला नव्हता. अधिकृत कागदपत्रे सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. सहायक निरीक्षक गरड आणि पथकाने दहीहंडी सोहळा साजरा करणाऱ्या मंडळांना शनिवारी भेट दिली. तेव्हा विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक गरड तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मावळातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का, सरपंच, उपसरपंचांसह सहा सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

दहीहंडी कार्यक्रमात राधाच्या अदांनी पुणेकर चाहते घायाळ झाले होते. राधाचे नृत्यही इंस्टावरुन व्हायरल झाले असून या नृत्यात अश्लील हावभाव केल्याचा आरोपही काही जणांकडून होत असून सोशल मीडियावर तशा कमेंटही पाहायला मिळत आहेत. त्यातच, आता कार्यक्रमाच्या नृत्य सादरीकरणासाठी आवश्यक प्रमाणपत्र न घेतल्याने राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

Web Title: A case has been registered in pune against dancer radha patil and two others

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • crime news
  • Dahi Handi 2026
  • Pune Police

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…
1

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद
3

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या
4

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.