Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत युवकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल; आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टी स्टॉलवर कामाला असणाऱ्या युवकाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सदर चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2025 | 01:21 PM
बारामतीत युवकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बारामतीत युवकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

बारामती : टी स्टॉलवर कामाला असणाऱ्या युवकाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सदर चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आदर्श हर्षवर्धन लोंढे, आदित्य विकास लोंढे (दोघे रा. लासुर्णे , ता. इंदापूर ), मयुर अंकुश गायकवाड रा. अंथूर्णे, ता. इंदापुर) अनिकेत सचिन शिंदे (रा लासुर्णे , ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक रतिलाल भिसे (रा. सावळ, ता. बारामती) याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक रतीलाल भिसे यांनी फिर्याद दिली की, त्यांचा लहान भाऊ हेमंत रतीलाल भिसे हा मेडीकल कॉलेज तांदुळवाडी सागर काजळे यांच्या टी पॉइंटवर कामास आहे. दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादीचा भाऊ हेमंत रतीलाल भिसे हा सागर काजळे यांचे टी पॉइंटवर कामास असताना यातील आदर्श हर्षवर्धन लोंढे, आदित्य विकास लोंढे, मयुर अंकुश गायकवाड, अनिकेत सचिन शिंदे यांनी पाच वर्षापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हेमंत भिसेला हाताने, लाथा -बुक्याने, कमरेच्या बेल्टने तसेच टेबलवरील लोखंडी कुलूप त्याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. यातील एका आरोपीने हेमंत याच्या हातातील व्ही.२९ ई मॉडेलचा मोबाईल जबरीने हिसकाऊन नेला आहे.

जखमी हेमंत भिसे याचा भाऊ दीपक भिसे याने दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेतील चौघांवर गुन्हा दाखल केला असून, बारामती तालुका पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे. दरम्यान सदर मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून बारामती परिसरात संताप व्यक्त करण्यात येत होता. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी फिर्याद दाखल होताच चौघा आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.

Web Title: A case of brutal beating of a youth in baramati has been revealed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • Arrested
  • Baramati Crime
  • Baramati Police
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
2

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
3

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.