Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

बारामती येथे वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीच्या मालकीचा केज येथील प्लॉट त्याच्या परस्पर बनावट व्यक्ती उभी करून आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2026 | 12:03 PM
बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

केज : बारामती येथे वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीच्या मालकीचा केज येथील प्लॉट त्याच्या परस्पर बनावट व्यक्ती उभी करून आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्ती केज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित नसतानाही त्याच्या नावाने दस्तनोंदणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दस्तनोंदणी केल्याचा दावाही करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर केज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन रवींद्र कोमटवार (रा. केज), प्रितम प्रकाश नांदेडकर (रा. अयोध्यानगर, धारूर) आणि शांतीनाथ प्रकाश काळे (रा. संभाजी चौक, धारूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोरडे वस्ती येथील प्रवीण निकम यांच्या नावे केज येथील गट क्रमांक २२८/२/४ मध्ये ३.६० आर क्षेत्रफळाचा खुला प्लॉट आहे. निकम यांनी हा प्लॉट १७ जानेवारी २०२३ रोजी कायदेशीररीत्या खरेदी केला होता. या मालमत्तेबाबत कोणताही वाद नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, १४ मे २०२५ रोजी केज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक १६८१/२०२५ अन्वये या प्लॉटचे खरेदीखत करण्यात आले.

दस्तनोंदणीच्या वेळी टोपी घातलेल्या व्यक्तीला केले कॅमेऱ्यासमोर उभे

या खरेदीखतावर प्रितम प्रकाश नांदेडकर आणि शांतीनाथ प्रकाश काळे हे साक्षीदार असल्याचे नमूद आहे. दस्तनोंदणीच्या वेळी टोपी घातलेल्या एका अज्ञात व्यक्तीला कॅमेऱ्यासमोर उभे करण्यात आले आणि त्याच्यावर जुन्या दस्तावरील प्रवीण निकम यांचा फोटो वापरण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या खरेदीखतासोबत हद्द कायम, पोटहिस्सा जमीन मोजणीचा नकाशाही जोडण्यात आला आहे. मात्र, प्रवीण निकम यांनी असा नकाशा मिळवण्यासाठी उपाधीक्षक, भूमी अभिलेख, केज यांच्याकडे कोणताही अर्ज केला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे संबंधित मोजणी नकाशाही बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दखल न घेतल्याने न्यायालयात धाव

फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवीण निकम यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली. मात्र, तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी केज न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या तक्रारीवरून सदर तीन जणांविरोधात केज पोलिस ठाण्यात रोहन रवींद्र कोमटवार (रा. केज), प्रितम प्रकाश नांदेडकर (रा. अयोध्यानगर, धारूर) आणि शांतीनाथ प्रकाश काळे (रा. संभाजी चौक, धारूर) यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे तपास करीत आहेत.

कार्यालयीन वेळेनंतर दस्तनोंदणीचा आरोप

संबंधित दस्तनोंदणी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सायंकाळी उशिरा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बनावट मालक आणि साक्षीदार उभे करून दस्तनोंदणीची प्रक्रिया पार पडल्याचा दावा करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार ?

खरेदी-विक्री व्यवहाराच्या वेळी संबंधित व्यक्तींच्या आधारकार्डसह ओळखपत्रांची पडताळणी आणि व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असते. या प्रकरणात आवश्यक पडताळणी करण्यात आली नसल्यास तत्कालीन दुय्यम निबंधक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचीही भूमिका तपासली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: A case of fraud has been registered against three individuals at the kej police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • baramati
  • Court
  • crime news

संबंधित बातम्या

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक
1

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
2

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
3

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
4

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.