Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं

जुन्या वादाचा राग मनात धरून दोन गटांनी एकमेकांवर हत्यारांसह हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना शनिवारी शहरातील येवला रस्त्यावरील हॉटेल शान ए मराठा व जीवनश्री कॉलनी परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2026 | 11:51 AM
वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं

वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं

Follow Us
Follow Us:
  • वैजापुरात जुन्या वादातून दोन गटांत हत्यारांसह हाणामारी
  • कोयते, कत्त्या व लोखंडी रॉडच्या हल्ल्यात अनेक जण जखमी
  • परस्परविरोधी फिर्यादींवरून २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
वैजापूर : जुन्या वादाचा राग मनात धरून दोन गटांनी एकमेकांवर हत्यारांसह हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना शनिवारी शहरातील येवला रस्त्यावरील हॉटेल शान ए मराठा व जीवनश्री कॉलनी परिसरात घडली आहे. कोयता, लोखंडी कत्ती, लोखंडी रॉड, फावड्याचा फायबर दांडा व लाकडी दांडक्यांचा वापर करीत झालेल्या या हाणामारीत ९ जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या जुन्या वादातून हा संघर्ष पेटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून २० ते २५ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा चंद्रकांत जाधव (रा. येवला रस्ता वय२१) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश विसर्जनावेळी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून शान पवार, रोहित पठारे, प्रितेश साळुंके, विशाल पवार, तुषार पठारे व आदेश शेवाळे यांच्यासह हॉटेलमधील इतर कामगारांनी लोखंडी कत्ती, कोयता आणि फावड्याच्या फायबर दांड्याने हल्ला करून डोक्यासह हातावर वार केले. यावेळी इतरांनाही मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

या हल्ल्यात कृष्णा जाधव, निर्भय पवार, विशाल रामदास कडे व सुजित राजपूत जखमी झाले आहेत. दरम्यान, हॉटेल व्यावसायिक भूषण पवार (वय ४०, रा. बजरंग चौक, वैजापूर) यांनीही याच घटनेप्रकरणी स्वतंत्र फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास हॉटेल शान-ए-मराठा परिसरात जुन्या वादातून जमावाने हल्ला केला. विशाल पवार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. हॉटेलमधील कामगारांनाही मारहाण करण्यात आली असून काहींची डोकी फोडल्याचा आरोप आहे. गणपती मंडळातील रोहित पठारे व तुषार पठारे यांनाही गंभीर मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी नितीन होंड, गौरव हॉड, गजू राजपूत, क्रिश राजपूत, संकेत आहेर, प्रतीक लुटे, सुजित ठाकूर ऊर्फ राजपूत, विशाल कडे, रोहित आहेर, हर्षद राजपूत, अमर राजपूत, तुषार आहेर व मयूर रहाणे आदी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

कायद्याचा धाक उरलाय का ?

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला असतानाही त्याच वादातून पुन्हा दोन गट आमनेसामने येतात व हत्यारांसह हल्ले करतात, ही बाब गंभीर आहे. शहर परिसरात भरदिवसा कोयते, कत्त्या व लोखंडी रॉड घेऊन जमाव एकमेकांवर तुटून पडत असेल, तर कायद्याचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा : कोयता आणि चाकुने वार करत तरुणाचा संपवला जीवनप्रवास; ईश्वरपूरमधील हत्येने परिसरात खळबळ!

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू 

या घटनेत विशाल पवार, शान पवार, संतोष शिहरे, आदेश शेवाळे व भूषण पवार जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून २० ते २५ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमींची स्थिती लक्षात घेता त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयासह येवला, कोपरगाव व शहरातील खासगी रुग्णालयांत उपचारासाठी हलविण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, एका जखमीला शहराबाहेर नेऊन मारहाण केल्यानंतर स्टेशन रोडच्या बाजूला फेकून दिल्याचा प्रकारही समोर आला आहे. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही तास धावपळ केली.

हे सुद्धा वाचा : पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला

💡

Frequently Asked Questions

  • Que: वैजापुरात दोन गटांत हाणामारी नेमकी कुठे झाली?

    Ans: शहरातील येवला रस्त्यावरील हॉटेल शान-ए-मराठा आणि जीवनश्री कॉलनी परिसरात ही घटना घडली.

  • Que: हाणामारीचे कारण काय होते?

    Ans: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून दोन्ही गटांत संघर्ष झाल्याचे समोर आले आहे.

  • Que: या हल्ल्यात किती जण जखमी झाले आणि पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: या हाणामारीत ९ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. परस्परविरोधी फिर्यादींवरून २० ते २५ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: A clash between two groups has occurred in vaijapur stemming from an old dispute nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला
1

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला

Udayanraje Bhosale : राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला
2

Udayanraje Bhosale : राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप
3

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…
4

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.