mira bhaindar फोटो सौजन्य - pinrerst)
भाईंदरमध्ये फक्त १० रुपयांच्या किरकोळ वादातून मीरा भाईंदर महानगरपालिका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना भाईंदरच्या गोडदेव नाका परिसरात शुक्रवारी (१८ एप्रिल ) रात्री सुमारे ८:३० वाजता घडली आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यावरून पालिकेच्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची विकृत कृती समोर असल्याचं पाहायला मिळालं आहे.
Cylinder Blast: पुलाची शिरोलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन महिला गंभीर जखमी
काय घडलं नेमकं?
भाईंदरच्या गोडदेव नाका परिसरात जमाल खान नावाचे इसम हातगाडीवर व्यवसाय करून आपला उदर्निर्वाह करतात. शुक्रवारी रात्री महानगरपालिकेच्या बाजार वसुली ठेकेदाराचे कर्मचारी पावती घेण्यासाठी त्यांच्या हातगाडीवर आले होते. त्यांनी ९० रुपयांची पावती दिली. जमाल खान यांनी त्यांना १०० रुपये दिले होते. उर्वरित १० रुपये परत मागितल्यावर वाद निर्माण झाला आणि बघता बघता वाद विकोपला. रागाच्या भरात जमाल खान यांच्यावर चाकूने पोटावर आणि पाठीवर वार केले. जमाल खान जखमी झाले आणि त्यांना तात्काळ मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दोघांना घेतलं ताब्यात
दरम्यान, या घटनेननंतर घटनास्थळावरून आरोपी पसार झाला होता. मात्र, नवघर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. केवळ दहा रुपयांसाठी प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जमाल खान याचा उपचार रुग्णालयात सुरू आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
प्रशासनाने याची गंभीर दाखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. महापालिकेच्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून अशा पद्धतीने दहशतीचा कारभार केल्या जात असल्याची चर्चा स्थानिकांत सुरू झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. फक्त 10 रुपयांसाठी प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या घटने नंतर हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.