शिरोलीमध्ये दोन महिला जखमी (फोटो- istockphoto)
गॅस सुरू करण्यासाठी त्यांनी देवाजवळ लावलेला दिवा खाली घेताच अचानक मोठा स्फोट झाला. यामध्ये सविता व कुसुम गंभीर जखमी झाल्या. सविता यांना सुमारे सत्तर टक्के भाजले आहे. तर कुसुम यांनाही मोठ्या प्रमाणात भाजले आहे. दोघींनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सविता यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने रात्री उशिरा त्यांना सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झालेली नव्हती.