Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! पार्टीत अगोदर मटण खाल्ले म्हणून मित्राला फावड्याने मारहाण; पुढे जे काही झाले…

नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 02, 2025 | 08:00 PM
काय सांगता! पार्टीत अगोदर मटण खाल्ले म्हणून मित्राला फावड्याने मारहाण; पुढे जे काही झाले...

काय सांगता! पार्टीत अगोदर मटण खाल्ले म्हणून मित्राला फावड्याने मारहाण; पुढे जे काही झाले...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: नव वर्षाच्या स्वागतासाठी तसेच थर्टीफस्टच्या पार्टीत मित्राने अगोदर मटण खाल्याने एकाने शिवीगाळ करून त्याला फावड्याने मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार कात्रज येथील नेपाळबाबा मंदीराजाच्या मागे घडला. याप्रकरणी धम्मपाल हणमंत सोनवणे (वय २१, रा. अंजनी नगर, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निंगेश एकनाथ म्हेत्रे (वय २३, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, निंगेश म्हेत्रे आणि धम्मपाल सोनवणे हे मित्र आहेत. त्यांनी कात्रज येथील नेपाळबाबा मंदीर परिसराजवळ थर्टीफस्टच्या पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी आरोपीने निंगेश यांना आमच्या अगोदर मटण का खातो असे म्हणत शिवीगाळ केली. नंतर त्याला फावड्याच्या दांडक्याने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुलीशी बोलल्याने पालकांना आला राग

नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

हेही वाचा: Pune Crime: ‘मुलीशी बोलल्याने पालकांना आला राग’; अल्पवयीन मुलासोबत केले असे काही की…, हैराण व्हाल

पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश तांडे याचे कुटूंब व पेटकर कुटूंब एकाच भागात राहण्यास आहेत. गणेश हा पेटकर यांच्या मुलीशी बोलत असल्याचा संशय कुटूंबियांना होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, मंगळवारी रात्री साडे बाराच्या सुमारास गणेश नेहमीप्रमाणे मित्रासोबत वस्तीत थांबलेला होता. तेव्हा वडिल तसेच त्यांची दोन मुले येथे आली. त्यांनी गणेशला गाठले. तिघांनी गणेशवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केला. हा हल्ला इतका क्रूर होता की, गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याघटनेनंतर परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी येथे धाव घेतली. तसेच, तिघांना ताब्यात घेतले. या खूनामुळे मात्र, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा:रोजगारासाठी चौघं पुण्यात आले अन् रिक्षाचालकांनी ‘झटका’च दिला; काय आहे प्रकरण? वाचाच

रोजगारासाठी चौघं पुण्यात आले अन् रिक्षाचालकांनी ‘झटका’च दिला

हाताला काम मिळविण्याच्या आशेने पुण्यात चौघांनी पाऊल ठेवले. पुर्वीपासून पुण्यात काम करणाऱ्या त्या मित्रांना संपर्क केला. रेल्वेने आलेल्या या चौघांना मात्र पहिलाच ‘झटका’ रिक्षाचालकांनी दिला. त्यांना इच्छितस्थळी सोडण्याचा बहाणा केला आणि निर्जनस्थळी मारहाण करीत लुटल्याची घटना पुणे स्टेशन भागात घडली. पुण्यनगरीत पाऊल ठेवताच आलेल्या या अनुभवाने चौघेही भितीच्या छायेत आहेत. दुसरीकडे शहरात रिक्षाचालकांनी लुटल्याच्या ७ घटना घडल्या आहेत. रिक्षाच्या आडून गुन्हेगारी फोफावत असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी विशाल चव्हाण (वय २०, रा. चाकण) याने तक्रार दिली असून दोन अनोळखी व्यक्तींवर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A friends beat up a friend for eating mutton first at a party katraj pune latest crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Mutton
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
1

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर
2

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर
3

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.