पुण्यात अल्पवयीन मुलाची हत्या (फोटो- istockphoto)
पुणे: नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश तांडे याचे कुटूंब व पेटकर कुटूंब एकाच भागात राहण्यास आहेत. गणेश हा पेटकर यांच्या मुलीशी बोलत असल्याचा संशय कुटूंबियांना होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, मंगळवारी रात्री साडे बाराच्या सुमारास गणेश नेहमीप्रमाणे मित्रासोबत वस्तीत थांबलेला होता. तेव्हा वडिल तसेच त्यांची दोन मुले येथे आली. त्यांनी गणेशला गाठले. तिघांनी गणेशवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केला. हा हल्ला इतका क्रूर होता की, गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याघटनेनंतर परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी येथे धाव घेतली. तसेच, तिघांना ताब्यात घेतले. या खूनामुळे मात्र, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रोजगारासाठी चौघं पुण्यात आले अन् रिक्षाचालकांनी ‘झटका’च दिला
हाताला काम मिळविण्याच्या आशेने पुण्यात चौघांनी पाऊल ठेवले. पुर्वीपासून पुण्यात काम करणाऱ्या त्या मित्रांना संपर्क केला. रेल्वेने आलेल्या या चौघांना मात्र पहिलाच ‘झटका’ रिक्षाचालकांनी दिला. त्यांना इच्छितस्थळी सोडण्याचा बहाणा केला आणि निर्जनस्थळी मारहाण करीत लुटल्याची घटना पुणे स्टेशन भागात घडली. पुण्यनगरीत पाऊल ठेवताच आलेल्या या अनुभवाने चौघेही भितीच्या छायेत आहेत. दुसरीकडे शहरात रिक्षाचालकांनी लुटल्याच्या ७ घटना घडल्या आहेत. रिक्षाच्या आडून गुन्हेगारी फोफावत असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी विशाल चव्हाण (वय २०, रा. चाकण) याने तक्रार दिली असून दोन अनोळखी व्यक्तींवर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: रोजगारासाठी चौघं पुण्यात आले अन् रिक्षाचालकांनी ‘झटका’च दिला; काय आहे प्रकरण? वाचाच
तक्रारदार तरूण आणि त्याचे मित्र, असे पाच जण असल्याने दोन रिक्षा कराव्या लागतील, असे त्या रिक्षाचालकाने सांगितले आणि अन्य एका रिक्षाचालकाला तेथे बोलावून घेतले. त्यानंतर ते पाच जण दोन रिक्षात बसून मार्गस्थ झाले. मात्र, रिक्षाचालकांनी त्यांना निर्जन स्थळी नेले. पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार मूळचा बिहारचा असून तो चाकण येथे एका आस्थापनेत काम करतो. त्याचे चार समवयस्क मित्र रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होते. दिनांक ३० डिसेंबरला पहाटे रेल्वेने ते पुण्यात दाखल झाले. तक्रारदारसह सर्व तुकाराम शिंदे वाहनतळासमोरील रस्त्यावर आले, तेथे त्यांनी घरी जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडे विचारणा केली. त्यावर एका रिक्षाचालकाने त्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी होकार दिला.