Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

बंद घरांची रेकी करून संधी मिळताच घरफोडी करण्याचा उद्योग करणाऱ्या महिलांच्या टोळीचा आळेफाट्यात पर्दाफाश झाला आहे. आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या पाठीमागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 26, 2026 | 12:30 AM
कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : हातात रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, खांद्यावर कचरा गोळा करण्याची पोती आणि चेहऱ्यावर निष्पाप भाव…पाहणाऱ्याला त्या केवळ कचरा वेचणाऱ्या महिला वाटाव्यात. मात्र या महिलांच्या हालचालींमागे सुरू होता एक धक्कादायक डाव. बंद घरांची रेकी करून संधी मिळताच घरफोडी करण्याचा उद्योग करणाऱ्या महिलांच्या टोळीचा आळेफाट्यात पर्दाफाश झाला आहे. आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या पाठीमागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरीचा डाव फसला आणि दोन महिलांना मुद्देमालासह पकडण्यात यश आले आहे.

 

संतवाडी शिवारातील भामाबाई सोनभाऊ निमसे यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून चार जणांच्या टोळीने घराला लक्ष्य केले. तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असलेल्या या टोळीने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील जुनी तांब्या-पितळेची भांडी, बंब आणि इतर साहित्य पोत्यांमध्ये भरले जात होते. दरम्यान, बंद घरातून काही हालचाल आणि आवाज ऐकू आल्याने भामाबाई यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून पाहणी केली असता, कचरा वेचण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या महिला घरातील साहित्य गोळा करत असल्याचे दिसून आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आरडाओरड केली.

‘कचरा वेचणाऱ्या’ नव्हे तर घरफोडीची रेकी करणाऱ्या!

ही टोळी परिसरात अनेक दिवसांपासून फिरताना दिसत होती. हातात रिकाम्या बाटल्या आणि कचऱ्याची पोती असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे संशयाने पाहत नव्हते. मात्र बंद घरांवर नजर ठेवून योग्य संधी साधण्याची त्यांची पद्धत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घर बंद असल्याची खात्री झाल्यानंतर लोखंडी हत्याराच्या सहाय्याने दरवाजा फोडून चोरी केली जात होती.

हे सुद्धा वाचा : मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

नागरिकांची तत्परता ठरली निर्णायक

भामाबाई यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी पाठलाग करून दोन महिलांना शिताफीने पकडले. तर एका महिलेसह एक पुरुष पसार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे दीड लाख रुपये किमतीची तांब्या-पितळेची भांडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून या टोळीने परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरी केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. कचरा वेचण्याच्या आडून घरांवर नजर ठेवणाऱ्या या टोळीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अनोळखी व्यक्तींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: A gang of women involved in house breaking and theft in alephata has been busted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले
1

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं
2

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी
3

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…
4

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.