Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी

पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या कारला कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 11, 2026 | 01:39 PM
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या कारला कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील बोटा येथील पाच भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना बुधवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील गुळंजवाडी शिवारात घडली आहे.

 

पंढरपूरहून परतणारी कार (एमएच १४ एनडी ३३७८) आणि समोरून येणारे पिकअप वाहन (एमएच २४ बीडब्ल्यू २८६२) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

स्थानिक ग्रामस्थ धावले मदतीला

या अपघातात जिजाभाऊ दत्तात्रय शेळके, चालक शिवाजी मेंगाळ, बाळासाहेब भागाजी मुसळे, सुभाष तुकाराम शेळके आणि आनंदा रामभाऊ मधे (सर्व रा. बोटा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार पिकअप वाहनाचा वेग अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या साहाय्याने सर्व जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Web Title: A horrific accident has occurred involving the car of devotees returning from pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
2

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
3

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश
4

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.