Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

जमीन बेकायदेशीररीत्या हडपण्यासाठी बनावट खरेदीखते, सातबारा, नमुना क्रमांक ८, करेक्शन डीड तसेच मागील तारखांचे नोटरी करारनामे तयार करून एका वकीलाची सुमारे ५० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 26, 2026 | 06:28 PM
जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : सावंगी येथील गट क्रमांक २३१/१ मधील १७ गुंठे जमीन बेकायदेशीररीत्या हडपण्यासाठी बनावट खरेदीखते, सातबारा, नमुना क्रमांक ८, करेक्शन डीड तसेच मागील तारखांचे नोटरी करारनामे तयार करून एका वकीलाची सुमारे ५० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार १ ते १७ फेब्रुवारी दरम्यान घडला आहे. या प्रकरणात तब्बल १८ जणांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात अॅड. सुशील मुरलीधर बियाणी (वय ४९, रा. उस्मानपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संबंधित जमीन सन २०१२ मध्ये नोंदणीकृत खरेदीखताद्वारे अ‍ॅड. बियाणी यांच्या मालकीत आली असून तेव्हापासून ती त्यांच्या ताब्यात आहे. मात्र १ फेब्रुवारी २०२६ रोजी जागेवर गेल्यानंतर तेथे बांधकामासाठी खोदकाम सुरू असल्याचे दिसून आले. चौकशी केली असता, नोटरी करारनाम्याच्या आधारे संबंधित व्यक्तींच्या सांगण्यावरून काम सुरू केल्याची माहिती ठेकेदाराने दिली. तक्रारदाराने मालकीची कागदपत्रे दाखविल्यानंतर काम तातडीने थांबविण्यात आले.

त्यानंतर झालेल्या बैठकीत संबंधितांनी विविध खरेदीखते, इसार पावत्या, सातबारा, नमुना क्रमांक ८ आणि इतर कागदपत्रे सादर केली. या सर्व दस्तऐवजांमधील चतुःसीमा, व्यवहार आणि मालकीच्या नोंदी खोट्या व बनावट असल्याचे अ‍ॅड. बियाणी यांनी फिर्यादीत नमुद केले आहे. याचवेळी संबंधीत आरोपींनी जमीन आमचीच असून पुन्हा जागेवर आल्यास जीवे मारु अशी धमकी दिल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी एजाज अहमद खान याच्या नावे कोणतीही जमीन नसतानाही त्याच्या नावावरून विविध व्यक्तींच्या नावे बनावट खरेदीखते नोंदविण्यात आली. त्यासाठी बनावट महसुली नोंदी तयार करून करेक्शन डीडच्या माध्यमातून माध्यमातून मूळ चतुःसीमा बदलण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तसेच जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर वापरून बनावट करारनामे तयार करण्यात आल्याचे देखील फिर्यादीत सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात उघडकीस आला प्रकार

जिल्हाधिकारी कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. संबंधित आरोपींनी केवळ या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याचाच प्रयत्न केला नाही, तर अशाच प्रकारे इतरांचीही सेटलमेंटच्या नावाखाली फसवणुक करण्यात आल्याचे फिर्यादीत उल्लेख आहे.

हे सुद्धा वाचा : घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई

हे आहेत आरोपी

या प्रकरणात सय्यद इर्शाद अली जैदी, सरफराज जैदी, जिशान सरफराज अली जैदी, नौशाद अली जैदी, दिलशाद अली जैदी, शहादाब अली जैदी, सय्यद जव्वाद अली जैदी, मोहम्मद मस्सी, शेख मजीद शेख इमाम, एजाज अहमद खान जब्बार अहमद खान यांच्यासह एकूण १८ जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.

Web Title: The police have registered a case against 18 people for defrauding a lawyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • fraud

संबंधित बातम्या

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
1

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ
2

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
3

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह
4

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.