Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वनराज आंदेकर खूनप्रकरणी मोठी अपडेट; 21 आरोपींविरुद्ध 1700 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पुणे पोलिसांनी १७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तब्बल २१ आरोपींविरोधात भक्कम पुरावा गोळा करून हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2025 | 11:53 AM
वनराज आंदेकर खूनप्रकरणी मोठी अपडेट; 21 आरोपींविरुद्ध 1700 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर
Follow Us
Close
Follow Us:

पुणे :  माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पुणे पोलिसांनी १७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तब्बल २१ आरोपींविरोधात भक्कम पुरावा गोळा करून हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, टोळी प्रमुख हा सोमनाथ सयाजी गायकवाड असल्याचेही दोषोरापत्रात म्हंटले आहे.

सोमनाथ गायकवाड, संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर, प्रकाश कोमकर, आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम, व समीर काळे यांच्यासह २१ जणांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. तसेच, यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा टोळी युद्धातून १ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घुन खून केला होता. या खूनाने शहरात मोठी खळबळ माजली होती. यात वनराज यांची बहिण तसेच भाऊजी यांचा सहभाग निष्पन्न झाला होता.

दरम्यान, आंदेकर कुटूंबियांसोबत वनराज यांची बहिण संजिवनी कोमकर व तिच्या कुटूंबियांचे प्रॉपर्टीवरून वाद होते. त्यातच नाना पेठेत संजिवनी कोमकर यांच्या दुकानावर पालिकेने अतिक्रमण कारवाई केली होती. ही कारवाई वनराज यांनी करण्यास लावली, असा समज कोमकर कुटूंबाचा होता. त्याचा राग त्यांच्यात मनात होता. घटनेच्या दोन दिवसांपुर्वी यावरून त्यांच्यात वादविवाद झाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात दुसरे महत्वाचे कारण सोमनाथ गायकवाड याच्या टोळीतील सदस्य निखील आखाडे याचा खून कृष्णा आंदेकर व त्याच्या साथीदारांनी केला होता. त्यावरून आरोपींनी एकत्रित येऊन कट रचून वनराज आंदेकर यांच्या खूनाचे प्लॅनिंग केले. तसेच, त्यांचा निर्घुन खून केल्याचे समोर आले.

वनराज यांच्या खूनप्रकरणाने पुन्हा शहरात टोळी युद्ध भडकण्याची चिन्हे दिसत होती. दरम्यान, खूनानंतर पोलिसांनी वाई परिसरातून आरोपींना पकडले होते. त्यांच्याकडून ८ पिस्तूल, १३ जिवंत काडतूसे, ७ कोयते, ७ दुचाकी ३ कार जप्त केल्या होत्या. पोलिसांनी गुन्याचा तपास करून एकूण २१ आरोपींना याप्रकरणात अटक केली. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच, ३९ साक्षीदार देखील तपासले आहेत. त्यानूसार पोलिसांनी तपास पुर्ण करून मोक्कानुसार १७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

दोषारोप पत्रातील महत्वाचे मुद्दे

घटनास्थळ, आंबेगाव पठार, दापोली येथील सीसीटीव्ही फुटेज

आरोपींच्या आवाजाचे नमुने

मोक्का कलम १८ चा जबाब

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १८३ प्रमाणे कार्यवाही

आरोपींची ओळख परेड

आरोपींनी मोबाईलद्वारे केलेले संभाषण व तांत्रिक विश्लेषण

आरोपींचे जुने गुन्हेगारी रेकॉर्ड

गोपनीय साक्षीदारांकडे तपास

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे केलेला तपास

Web Title: A lot of information has come to light in the murder case of former corporator vanraj andekar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Murder Case
  • Police News
  • pune murder
  • Pune Police
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?
1

“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?

New Year Party: कोकणात पर्यटकांची गर्दी; रत्नागिरी पोलिसांनी वाढवला बंदोबस्त
2

New Year Party: कोकणात पर्यटकांची गर्दी; रत्नागिरी पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
3

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

पोलिसच सुरक्षित नाहीत! हवालदाराच्याच खात्यातून काढले ८ लाख रूपये; कुठे घडली घटना?
4

पोलिसच सुरक्षित नाहीत! हवालदाराच्याच खात्यातून काढले ८ लाख रूपये; कुठे घडली घटना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.