Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेणापूर परिसरात खळबळ! शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रेणापूर तालुक्यातील कासारगाव येथे शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणात ९ जणांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 03:00 PM
रेणापूर परिसरात खळबळ! शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रेणापूर परिसरात खळबळ! शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

लातूर : रेणापूर तालुक्यातील कासारगाव येथे शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणात ९ जणांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला होता. हा वाद इतका वाढला की संबंधित व्यक्तींनी धारदार व काठ्यांचा वापर करून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

रेणापूर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात शिवाजी बाबुराव आमण्णावर, गोविंद शिवाजी आमण्णावर, ज्ञानेश्वर शिवाजी आमण्णावर, गोवर्धन गोपाळ आमण्णावर, करण गोपाळ आमण्णावर, गोजरबाई शिवाजी आमण्णावर, राणी गोविंद आमण्णावर, सोनाली ज्ञानेश्वर आमण्णावर आणि गोपाळ शिवाजी आमण्णावर या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृत व्यक्ती मनोज उमर माणिक आमण्णावर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून, परमेश्वर माणिक आमण्णावर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : अमृतसरमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या ASIची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; पंजाब पोलिसात खळबळ

पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं

दारू पिऊन त्रास देत असल्यावरून मुलीनेच आपल्या वडीलांचा चाकूने छातीत वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून, मुलीकडूनच वडिलांचा खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय ७०, रा. काशिवाडी) असे खुन झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय ४०, रा. पोलीस चौकीच्या समोर, काशिवाडी) हिला अटक केली आहे. हा प्रकार काशीवाडी पोलिस चौकीच्या समोर त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री आकराच्या सुमारास घडला आहे. याबाबत जैनुद्दीन यांच्या पत्नीने तक्रारदार दिली आहे. जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळी राहतात. दिलशाद हिचा विवाह झाला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दारु पिऊन घरी आले. ते दिलशाद हिला शिवीगाळ करु लागले. तर त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशाद हिने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अधिकरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.

Web Title: A man has been murdered in the renapur area over a dispute over agricultural land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
1

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
2

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
4

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.