Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! सख्ख्या भावाने झोपेतच घेतला भावाचा जीव; डोक्यावर सपासप वार केले अन् नंतर मृतदेहाजवळ…

उन्हाळ्यामुळे आई-वडील आणि शुभम अंगणातच झोपले होते. मध्यरात्री हरिश्चंद्र पुन्हा घरी परतला. रागाच्या भरात खाटेचा दांडा उचलून झोपेत असलेल्या शुभमच्या डोक्यावर सपासप वार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2026 | 08:27 AM
खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपुरातही हत्याकांड घडले. घरातील आर्थिक ओढाताण, सततचे वाद आणि टोमण्यांचा राग मनात धरून थोरल्या भावाने धाकट्याची झोपेतच निर्घृण हत्या केली. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कटांगधरा गावात घडली.

हरिश्चंद्र बाबुलाल पंधराम (वय ३४) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शुभम बाबुलाल पंधराम (वय २८) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राईबाई बाबुलाल पंधराम (६०, रा. कटंगधरा, हिंगणा) यांचा लहान मुलगा शुभमचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. कौटुंबिक कारणामुळे पत्नी माहेरी राहायला गेली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. धाकटा मुलगा शुभम आणि वडील काम करून घर चालवत होते. मात्र, मोठा मुलगा हरिश्चंद्र कोणतेही कामधंदे करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन असल्याने घरात नेहमीच वाद व्हायचे.

शुभम वारंवार व हरिश्चंद्रला कामधंदा करण्याबाबत बोलत होता. पण, यामुळेच दोन्ही भावंडांत वाद झाला. हा वाद वाढताच वडिलांनी मध्यस्थी करत हरिश्चंद्रला घराबाहेर पाठविले. उन्हाळ्यामुळे आई-वडील आणि शुभम अंगणातच झोपले होते. मध्यरात्री हरिश्चंद्र पुन्हा घरी परतला. रागाच्या भरात खाटेचा दांडा उचलून झोपेत असलेल्या शुभमच्या डोक्यावर सपासप वार केले. शुभम जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी काही वेळ मृत भावाच्या देहासमोर बसून होता.

आईने फोडला टाहो

रात्री १ वाजता आईला जाग आल्यानंतर तिने मुलाला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले. तिच्या आरडाओरड्यानंतर गावकरी जमा झाले. माहिती मिळताच हिंगणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार जितेंद्र बोबडे, उपनिरीक्षक वसंत शेडमाके, अनिल झाडे आणि सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्रला ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Mira Bhayander Crime : मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती; मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर

Web Title: A man murder his real brother incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
1

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
2

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई
3

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
4

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.