Mira Bhayander : मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती; मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर
तक्रारीनुसार, पतीची खरी ओळख समोर आल्यानंतर घरात वाद वाढू लागले. आरोपीने वारंवार धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला तसेच विरोध केल्यास मारहाण, मानसिक त्रास आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेने पुढे असा दावा केला आहे की, सातत्याने होणाऱ्या दबावामुळे आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अखेर तिने धर्मांतर करून “नसरीन आलम” हे नाव स्वीकारले.महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीकडे असलेल्या बहुतांश ओळखपत्रे आणि कागदपत्रांवर “मनोज” हे नाव नमूद होते. मात्र, व्होटर आयडीवरील “नूर” या नावामुळे संशय निर्माण झाला आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.याशिवाय, आरोपीकडून अनेक वर्षे मानसिक छळ करण्यात आला असून काही काळापासून त्याने “तू तुझं बघ” असे सांगत पत्नी व कुटुंबापासून दुरावा ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली असून भाईंदरमधील राहते घर ईएमआयवर घेतल्याचेही सांगितले जात आहे.
बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल…
दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून विवाहाच्या वेळी ओळख लपवणे, धर्मांतरासाठी दबाव आणि कौटुंबिक छळ यांसारख्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नमूद केलेले आरोप हे तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार असून त्याबाबत आरोपीची बाजू अद्याप समोर आलेली नाही. प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.






