Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक हादरलं ! नवीन प्रियकराच्या मदतीने पार्टनरचा काढला काटा; मृतदेह कसारा घाटात नेला अन्…

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनेच आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीने जोडीदाराचा गळा आवळून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2026 | 01:19 PM
नाशिक हादरलं ! नवीन प्रियकराच्या मदतीने पार्टनरचा काढला काटा; मृतदेह कसारा घाटात नेला अन्...

नाशिक हादरलं ! नवीन प्रियकराच्या मदतीने पार्टनरचा काढला काटा; मृतदेह कसारा घाटात नेला अन्...

Follow Us
Follow Us:

नाशिक : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनेच आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीने जोडीदाराचा गळा आवळून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट कसारा घाटातील खोल दरीत फेकून देण्यात आला. मात्र, पोलिसांच्या तपासाच्या चक्रांपुढे हे थरारक हत्याकांड उघडकीस आले असून गुन्हे शाखा युनिट एक व इंदिरानगर पोलिसांनी मुख्य संशयित महिलेसह तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.

वसंत गोरखनाथ सातपुते (वय ३९, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) हे संशयित हसीना हबीब शेख (वय ३७) हिच्यासोबत गेल्या १५ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होते. वसंत बेरोजगार असल्याने हसीनाच त्यांचा संपूर्ण खर्च चालवत होती. ५ ऑगस्टच्या सायंकाळी वसंत घरात झोपलेले असताना हसीनाला भेटण्यासाठी तिचा नवीन प्रियकर साहिल शहा (रा. वडाळागाव) तेथे आला. वसंत यांना अचानक जाग आल्याने त्यांनी साहिलला पाहून जाब विचारला. यातून वाद पेटला आणि संतापलेल्या साहिलने वसंत यांचा गळा आवळून जागीच गेम केला. यानंतर हसीना आणि साहिलने मृतदेह कारमध्ये टाकून कसारा घाटात फेकून दिला.

मित्राच्या सतर्कतेने फुटला भांडाफोड

वसंत अचानक गायब झाल्याने त्यांचा मित्र कचरू कडवे यांना संशय आला. त्यातच हसीनाची बदलेली वर्तणूक पाहून कचरू यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाची व हत्येची शंका व्यक्त करत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत हसीना व साहिलला ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

संशयितांना २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पोलीस निरीक्षक कारंडे, उपनिरीक्षक वाय. बी. शिरसाठ आणि गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने कसून चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांना कसारा घाटात नेऊन दरीतून मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा : आईने पकडले हात, प्रियकराने आवळला गळा; पतीच्या मित्रासोबतच्या प्रेमसंबंधातून चिमुकलीची हत्या

Web Title: A murder has taken place within the jurisdiction of the indiranagar police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
1

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
2

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
3

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
4

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.