(फोटो सौजन्य: Pinterest)
ही घटना १५ जून रोजी घडून आली. मेहरा बुजुर्ग गावातील एका विहिरीत ६ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला ज्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली. सुरुवातीला मुलीची ओळख पोलिसांसाठी एक आव्हान बनले होते पण सोशल मिडिया आणि अन्य माध्यमांचा वापर करुन माहिती गोळा करण्यात आली ज्यातून तिची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी त्याला रुग्णालयात पाठवले. फाॅरेंसिक रिपोर्ट आणि अन्य पुराव्यांच्या आधारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीविरोधात अनेक ठोस पुरावे मिळाले ज्याच्या मदतीने आरोपींना शोधण्यात मोठी मदत झाली.
मोबाईल ठेवला होता बंद
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी चाैकशीपासून वाचण्याासाठी आपला मोबाईल फोन बंद करुन बसले आहे. ते येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवरून एकमेकांसोबत संपर्क साधत होते. इतकं करुनही सायबर सेलने तांत्रिक पुरावे, टाॅवर लोकेशन आणि इतर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लावला.
पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी ग्वाल्हेरमध्ये दोन्ही संशयितांना पकडून आपल्या ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी चाैकशीदरम्यान आपली आरोपातील आपली भूमिका स्पष्ट केली आणि मुलीचा खून त्यांनी मिळून केल्याचे कबूल केले. महिलेचे आपल्या पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध सुरु होते. कथितरित्या मुलगी तिच्या आजोबांकडे जाण्याचा हट्ट धरुन होती ज्यावर आरोपींना आपलं भांड फुटतंय की काय असा संशय येऊ लागला. मुलगी आजोबांकडे गेली तर अफेअरची माहिती सर्वांपर्यंत पोहचेल आणि मोठी नाचक्की होईल या भावनेने आईने प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या मुलीला मारुन टाकण्याचे ठरवले. दोघांनी रात्रीच्या अंधारत मुलीला विहिरीजवळ नेले आणि तिथेच तिची हत्या केली. यावेळी आईने मुलीचे हात पकडले तर प्रियकराने मुलीचा गळा आवळला. यानंतर मुलीच्या मृतदेहाला त्यांनी विहिरीत ढकलून दिले.
मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणात आता पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन संबंधित कलमांखाली त्यांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयीन कारवाईनंतर दोघांनाही पोलिस कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली. या ब्लाईंड मर्डरचा खुलासा कमीतकमी वेळीत केल्यामुळे पोलीस पथकाला प्रोत्साहन करण्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.