Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस दलात खळबळ! पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण…

पुणे शहर पोलीस दलातील तपास पथकाचे प्रमुख असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2025 | 11:02 AM
पुणे पोलीस दलात खळबळ! पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण...

पुणे पोलीस दलात खळबळ! पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील तपास पथकाचे प्रमुख असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, लोणावळा पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. अण्णासाहेब बादशाह गुंजाळ (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आण्णा गुंजाळ हे खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते खडकी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख अधिकारी होते. तीन दिवसांपासून ते गैरहजर होते. पोलीस ठाण्यात येत नसल्याने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण, संपर्क होऊ शकला नव्हता. दरम्यान, सलग चौथ्या दिवशी गैरहजर राहिल्याने तसेच त्यांचा काहीच संपर्क होत नसल्याने स्थानिक पोलीस त्यांची मिसींग दाखल करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याचवेळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. गुंजाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविले.

लोणावळा येथील टायगर पाँईटला त्यांनी एका झाडाला गळफास घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे समजू शकलेले नाही. परंतु, अधिक माहिती देण्यास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टाळाटाळ केली. आण्णा गुंजाळ यांचा विवाह झालेला आहे. त्यांना दोन जुळी मुलं आहेत. त्यांच्या अशा जाण्याने कुटूंबासह पोलीस दलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला; तरुणाने डोक्यात घातला दगड

धनकवडीत तरुणाची आत्महत्या

राज्यात आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढतचं आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्या झाल्याच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली धनकवडी भागात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. सनी रमेश आठवले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत कुंदन बाबुराव आठवले (वय ५२, रा. ओगलेवाडी, जि. सातारा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : गुन्हेगारांमध्ये खळबळ! माळेगाव पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; तिघांवर थेट तडीपारची कारवाई

Web Title: A police sub inspector of pune police force has committed suicide by hanging himself nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Death
  • maharashtra
  • Police News
  • Pune Police

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
4

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.