Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बसमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीची छेड; बार्शीतील संतापजनक प्रकार

बसमध्ये प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीला एका अनोळखी युवकाने मोबाइलमधील पॉर्न व्हिडिओ दाखवून अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 29, 2024 | 12:57 PM
बसमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीची छेड; बार्शीतील संतापजनक प्रकार

बसमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीची छेड; बार्शीतील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

सोलापूर : राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बारामती ते इंदापूरमार्गे बार्शीकडे निघालेल्या बसमध्ये प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीला एका अनोळखी युवकाने त्याचे मोबाइलमधील पॉर्न व्हिडिओ दाखवून अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीने बार्शी शहर पोलिसात दिली आहे. रमेश सुब्राव बनसोडे (रा. भीमनगर, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलगी आई वडिलासोबत गावी जाण्यासाठी बार्शीकडे येणाऱ्या बसमध्ये बसली होती. या बसमध्ये आरोपी अनोळखी युवकही प्रवास करत होता. अल्पवयीन मुलीच्या आई वडिलासोबत बोलू लागला. त्या दरम्यान तो युवक अल्पवयीन मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत जवळीक साधत असल्याचे पीडिताच्या लक्षात आले.

दरम्यान जैन मंदिर बार्शी येथे एसटी बस आल्यानंतर तो संशयित आरोपी त्या अल्पवयीन मुलीजवळ जाऊन बसला व त्याचे मोबाइलमधील पॉर्न व्हिडिओ अल्पवयीन मुलीला दाखवले. अश्लील चाळे करू लागला. त्या दरम्यान अल्पवयीन पीडिताने घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली. त्या संशयित युवकाने त्याचे नाव रमेश सुब्राव बनसोडे असे सांगितले असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस थेट पोलिस ठाण्यातच नेली. अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी त्या युवकास पकडले. त्याच्याकडून मोबाइल काढून घेतला. या वेळी सोबतच्या अन्य प्रवाशांनीही मदत केली. त्याला पकडून बस बार्शी शहर पोलिस स्टेशनला आणली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

हे सुद्धा वाचा : कराडमधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तब्बल ‘इतक्या’ महिलांची केली सुटका

राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

Web Title: A shocking case of a minor girl being molested by showing obscene videos in a bus has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 12:57 PM

Topics:  

  • Barshi Police
  • cmomaharashtra
  • crime news
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Solapur News

संबंधित बातम्या

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी
1

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई
2

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी
3

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
4

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.