Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Sucide News : पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्…

इमारतीच्या पाचव्या माजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2026 | 12:15 PM
पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्...

पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. इमारतीच्या पाचव्या माजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

रिद्धी रवी केडिया (वय १७, रा. निर्मल पार्क सोसायटी, चव्हाण नगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिद्धीने नुकतीच बारावीत प्रवेश केला होता. ती शनिवारवाडा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

सर्व जण झोपले असताना उडी मारल्याची शक्यता

बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर घरातील सर्व जण झोपी गेले. रिद्धी तिच्या आजीजवळ झोपायची. पहाटे आजीला जाग आली तेव्हा त्यांना रिद्धी दिसली नाही. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. पहाटे सर्वजण जागे झाले. त्यांनी घरात शोधाशोध केली. मात्र, ती घरात आढळून आली नाही. घराचा दरवाजा पाहिला असता तो आतून कडीकोयंडा लावून बंद होता. त्यामुळे घराच्या गॅलरीमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना एक स्टूल तेथे ठेवलेले दिसला.

हे सुद्धा वाचा : पोलीस ठाण्यात विष प्राशन; सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, मृत्यूपूर्वी व्हिडिओत पोलिसांवर गंभीर आरोप

कुटुंबीयांनी तात्काळ इमारतीच्या खाली धाव घेतली. पार्किंग व मोकळ्या जागेत शोध घेतला असता रिद्धी निपचित पडलेली दिसली. कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिला रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि वह्या, पुस्तके ताब्यात घेतली आहेत. पुढील तपास सहकारनगर पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काटा; सापाच्या दंशाने केली हत्या

बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत या व्यवसायिकाची भागिदारी होती. खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये खलील शेख यांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचं नाव घेतलं आहे.

Web Title: A shocking incident has occurred in pune where a girl committed suicide by jumping from a balcony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Police Action
  • Sucide News

संबंधित बातम्या

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
1

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
2

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
4

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.