Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 12, 2026 | 06:34 PM
इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; सोबत असलेलं 6 महिन्यांचं बाळ सुखरूप

इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; सोबत असलेलं 6 महिन्यांचं बाळ सुखरूप

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी वसुधा धनंजय गरड (वय २९, रा. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीर रशिद शेख (वय ३२), हैदर रशिद शेख (वय ३४, दोघेही रा. कलवड) तसेच अन्वर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जून रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास शांतिरक्षक सोसायटीच्या गेटसमोर घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार वसुधा गरड दुचाकीवरून शांतिरक्षक सोसायटीच्या गेटसमोरून जात होत्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवत त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामध्ये तक्रारदार गंभीर जखमी झाल्या. धडक दिल्यानंतर आरोपींनी तक्रारदारांना धमकावत, “तू माझ्यावर, माझ्या भावावर व माझा मामा अन्वर पठाण यांच्यावर दाखल केलेली केस मागे घे. आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर तुझा काटा काढू,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक खेडकर करत आहेत.

हे सुद्धा वाचा : सायबर चोरट्याच्या बँकॉकमधून आवळल्या मुसक्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलची मोठी कारवाई

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून

आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या खुनाची धक्कादायक घटना शुक्रवारी ( दि. ५) पहाटे उघडकीस आली आहे. दरम्यान, या खुनानंतर आरोपीने सोशल मीडियावर ‘वन मॅन शो कसा ठोकला’ अशा आशयाचे स्टेटस बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घोडेगाव पोलिसांनी एका विद्यार्थ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : प्रणित मोरेसह ‘त्या’ दोघांवर मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Web Title: A shocking incident has occurred in pune where a woman was hit by a car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
2

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.