Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरूर हादरलं! पोटच्या मुलानेच केला आईचा खून; बेदम मारहाण करुन जागेवरच संपवलं

शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे पोटच्या मुलानेच आईला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर आईचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 11:37 AM
शिरूर हादरलं! पोटच्या मुलानेच केला आईचा खून; बेदम मारहाण करुन जागेवरच संपवलं

शिरूर हादरलं! पोटच्या मुलानेच केला आईचा खून; बेदम मारहाण करुन जागेवरच संपवलं

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे पोटच्या मुलानेच आईला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर आईचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासातून हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दिलीप राघोबा चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कुंदा राघोबा चौधरी (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप चौधरी हा आई कुंदा चौधरी यांना नेहमी त्रास देत असल्याने त्या आपल्या भाऊ व बहिणीकडे राहत होत्या. १४ जुलै रोजी दिलीप हा जुन्नर तालुक्यातील मामाच्या व मावशीच्या घरी जाऊन, यापुढे आईला कोणताही त्रास देणार नाही, असे आश्वासन देत त्यांना पुन्हा घरी घेऊन आला. सायंकाळच्या सुमारास मात्र त्याने आईला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांनी याची माहिती कुंदा चौधरी यांचे भाऊ भास्कर कबाडी यांना दूरध्वनीवरून दिली. मात्र, तोपर्यंत कुंदा चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी तसेच पोलिसांचे व फॉरेन्सिक पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा सुरू असताना दिलीप चौधरी हा आईचा गाडीवरून पडून मृत्यू झाल्याचे सांगत होता. मात्र, मृत महिलेच्या शरीरावरील गंभीर जखमांच्या खुणा पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दिलीप चौधरी याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी भास्कर दशरथ कबाडी (वय ५५, रा. कबाडवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिलीप राघोबा चौधरी (रा. चौधरी वस्ती, निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : कायद्याचा रक्षक बनला भक्षक! सामूहिक बलात्कार पीडित १३ वर्षीय मुलीचे वकिलाकडूनच लैंगिक शोषण

प्रथम आकस्मात मृत्यूची नोंद; नंतर खुनाचा गुन्हा

निमगाव म्हाळुंगी येथील या प्रकरणात सुरुवातीला महिलेचा गाडीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली होती. त्यामुळे प्रथम आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, सखोल तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि शवविच्छेदन अहवालातून मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: A shocking incident has occurred in shirur taluka where a son murdered his own mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
3

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
4

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.