Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्…

पसुरे- कर्नवडी (ता. भोर) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ( दि.२० ) रात्री घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 22, 2026 | 12:49 PM
धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्...

धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्...

Follow Us
Follow Us:

​भोर : पसुरे- कर्नवडी (ता. भोर) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ( दि.२० ) रात्री घडली आहे. पतीने घराला आग लावून पत्नीला आत कोंडून पळ काढला, मात्र सुदैवाने पत्नीने दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडत आपला जीव वाचवला. या भीषण आगीत संपूर्ण घर आणि घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या असून, पोलिसांनी ५० वर्षीय आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत असे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास याच कारणावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजता आरोपी घराबाहेर गेला आणि एका बाटलीत डिझेल घेऊन परतला. त्याने ती बाटली बेडरुममध्ये लपवून ठेवली आणि तो पुन्हा बाहेर निघून गेला.

रात्री साडेनऊच्या सुमारास पीडित महिला आपल्या मुलाची वाट पाहत असताना आरोपी घरात शिरला. त्याने पुन्हा वादाला सुरुवात केली आणि “घरात कोण आहे?” अशी विचारणा करत अश्लील शिवीगाळ केली. “आज तुला जाळूनच टाकतो,” असे धमकावत त्याने बेडरुममध्ये डिझेल ओतून आग लावून दिली. क्रूरतेचा कळस म्हणजे, पत्नी घरात असतानाच त्याने मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि तिथून पळ काढला.​घराने पेट घेतल्यानंतर पीडित महिलेने प्रसंगावधान राखले आणि मागच्या दरवाजातून बाहेर धाव घेतली. तिने तात्काळ शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले. यात संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर पीडित पत्नीने भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. शनिवार (दि.२१) रोजी पहाटे आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दिप्ती करपे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : शिरूर पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचे नुकसान; महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे सुरू

Web Title: A shocking incident has taken place in bhor where a husband tried to burn his wife alive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bhor Crime
  • crime news

संबंधित बातम्या

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
1

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
2

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
3

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
4

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.