Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड हादरलं! शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग अनावर; बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या

पोटच्या ९ वर्षांच्या मुलीची वडिलांनीच लाकूड कापण्याच्या मशीनने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथून उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2026 | 02:01 PM
दौंड हादरलं! शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग अनावर; बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या

दौंड हादरलं! शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग अनावर; बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या

Follow Us
Follow Us:
  • शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग अनावर
  • बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या
  • दौंडमधील घटनेमुळे मोठी खळबळ
पाटस : शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पोटच्या ९ वर्षांच्या मुलीची वडिलांनीच लाकूड कापण्याच्या मशीनने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथून उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घर पेटवून दिले. या प्रकरणी वडिलांसह एका महिलेवर दौंड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

शांताराम दुर्योधन चव्हाण (वय ३३) व चिंगु शिंदबाद भोसले, (दोघे रा. हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ, देऊळगाव राजे ता. दौंड, जि. पुणे ) अशी या आरोपींची नावे आहेत.

दौंड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम दुर्योधन चव्हाण याची ९ वर्षांची मुलगी अनामिका हिने तिचा भाऊ संस्कार याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केली. या रागातून शांताराम चव्हाण याने घरातील लाकडे कापण्याची मशीन सुरू करून अनामिकाच्या गळ्यावर, डोक्यावर व गालावर वार करून तिचा निघृण खुन केला. हा नराधम बाप एवढ्यावरच थांबला नाही तर खून केल्यानंतर मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घर पेटवून दिले. यामध्ये त्या मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. ही घटना ३ मे २०२६ पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या आसपास देऊळगाव राजे हद्दीतील हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ येथे घडली आहे.

या घटनेवेळी घरात असलेल्या चिंगु शिंदबाद भोसले या महिलेने सदरची घटना कोणालाही सांगू नकोस असे आरोपीला सांगून माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई निलेश फडणीस यांनी याप्रकरणी शांताराम दुर्योधन चव्हाण या मुख्य आरोपी व चिंगु शिंदबाद भोसले यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा तसेच पुरावा नष्ट करणे तसेच विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट उसळली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! कॅबिनेट मंत्र्याच्या स्विय सहाय्यकाकडून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

Web Title: A shocking incident has taken place in daund where a father killed his own daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • crime news
  • Daund Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
1

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक  गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…
2

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
3

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
4

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.