Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

मंचर येथील लालबाग प्रेस्टीज परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसर सुन्न झाला आहे. एका आईच्या टोकाच्या निर्णयाने समाजमन हेलावून गेले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 05:53 PM
आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला...; मंचरमधील धक्कादायक प्रकार

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला...; मंचरमधील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

मंचर : मंचर येथील लालबाग प्रेस्टीज परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसर सुन्न झाला आहे. संतापाच्या भरात आईने प्रथम १३ वर्षीय मुलीवर घरातच वायरीच्या सहाय्याने गळा आवळून जीवघेणा हल्ला केला आणि ती मृत झाल्याचे समजून घराला कुलूप लावले. त्यानंतर सहा वर्षीय मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत सहा वर्षीय निहांतचा मृत्यू झाला असून, मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली आहे. संबंधित आई हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५ रा.मंचर ता. आंबेगाव) या थोडक्यात बचावल्या आहेत. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ३) सकाळी उघडकीस आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास प्रॉपर्टीच्या कारणावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून हर्षदा बाणखेले यांनी संतापाच्या भरात मुलगी परीज्ञाचा वायरीच्या सहाय्याने गळा आवळून व मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला घरातच बंद करून ठेवण्यात आले. यानंतर त्यांनी सहा वर्षीय मुलगा निहांत याला दुचाकीवर घेऊन तपनेश्वर मंदिराजवळील विहिरीकडे जाऊन मुलासह स्वतः उडी मारली. हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ धाव घेत दोघांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र, निहांतचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले, तर हर्षदा बाणखेले या जखमी अवस्थेत बचावल्या.

हे सुद्धा वाचा : ​ओतूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना! ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू

मुलगी गंभीर जखमी अवस्थेत

दरम्यान, घरात बंद केलेली मुलगी परीज्ञा ही गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पती आशिष बाणखेले यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मंचर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून, एका आईच्या टोकाच्या निर्णयाने समाजमन हेलावून गेले आहे.

Web Title: A shocking incident has taken place in manchar where a woman fatally attacked her own daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Death
  • Manchar

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.