Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्…

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा डोक्यात रिकामा सिलिंडर घालून खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील येवलेवाडी भागात घडली आहे. खूनानंतर आरोपी पती येवलेवाडी पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 07:10 PM
चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्...

चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा डोक्यात रिकामा सिलिंडर घालून खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील येवलेवाडी भागात घडली आहे. खूनानंतर आरोपी पती येवलेवाडी पोलिस ठाण्यात हजर झाला असून, पोलिसांनी रात्री उशीरा त्याला अटक केली आहे. गीता जाधव-कर्चे (वय २६, सध्या रा. येवलेवाडी, मूळ रा. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती राजेंद्र जनार्दन कर्चे (वय ३२, मूळ रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र येवलेवाडीतील एका बांधकाम साईटवर रंगकाम करतो. गीताचा विवाह झाला होता. ती पतीपासून विभक्त झाली असून, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गीता आणि राजेंद्र यांनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरी विवाह केला होता. दोघे येवलेवाडीतील गृहप्रकल्पाच्या आवारात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नी गीताच्या चारित्र्याचा संशय घेत होता. शुक्रवारी (२२ मे) त्यांच्यात वाद झाले. नंतर शनिवारी पहाटे त्याने गीताच्या डोक्यात सिलिंडर घालून खून केला. खून केल्यानंतर त्याने बाहेरून खोलीचा दरवाजा लावून घेतला. राजेंद्र पसार होण्याच्या तयारीत होता. दिवसभर तो येवलेवाडीत फिरला. नंतर शनिवारी (२३ मे) सायंकाळी सहाच्या सुमारास येवलेवाडी पोलिसांकडे हजर झाला. पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच येवलेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे सुद्धा वाचा : मेहुणी सोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून घर जावयाची हत्या; मृतदेह 15 फूट खड्ड्यात पुरला आणि…

आरोपीला घेतले ताब्यात

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा गीता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. ‘प्राथमिक तपासात आरोपीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणाचा तपास सुरू आहे’, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a husband murdered his wife 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा
1

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
2

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
3

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
4

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.