Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार

चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गळा आवळून प्रेयसीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलम महेंद्र गायकवाड (वय २२. रा) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 06:40 PM
फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्...; सासवडमधील धक्कादायक प्रकार

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्...; सासवडमधील धक्कादायक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:

सासवड : कॉलेजला गेलेल्या मैत्रिणीला कॉलेज सुटल्यावर घरी जात असताना फोन करून मला तुझ्याशी बोलायचे आहे. असे म्हणून गोड बोलून खानवडी जवळील गायरानमध्ये नेले. तिथे गेल्यावर बोलत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलम महेंद्र गायकवाड (वय २२) असे खून झालेल्या युवतीचे नाव असून, तिचा खून करणारा अनिकेत विष्णु जाधव हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला सोमवार ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

नीलमचे वडील महेंद्र प्रल्हाद गायकवाड (वय ५०) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मयत निलम आणि आरोपी अनिकेत जाधव हे दोघे पुरंदर तालुक्यातील माळशिरस या एकाच गावचे असून, अनेक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. याबाबत नीलमच्या वडिलांना कुणकुण लागताच त्यांनी आरोपी व त्याच्या कुटुंबियांना मुलीशी संबंध ठेवू नयेत याची तीन वर्षापूर्वी कल्पना दिली होती.

निलम सध्या सासवडला वाघिरे कॉलेजमध्ये बीएच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. १ एप्रिल रोजी कॉलेज सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे सायंकाळी घरी न आल्याने तिला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने फोन उचलला नसल्याने वडिलांनी तिच्या मैत्रिणींशी संपर्क केला. तेव्हा आम्ही जाताना बरोबर होतो. मात्र परत येताना भेटली नसल्याचे मैत्रिनीने सांगितले. त्यामुळे रात्री उशिरा जेजुरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली.

दरम्यान रात्री ११ .३० वाजता पोलिसांनी फोन करून सासवड ग्रामीण रुग्णालयात बोलवले. तिथे जाऊन पहिले असता निलमचा गळा सुजलेला होता. तिच्या संपूर्ण अंगावर जखमा दिसून आल्या. तिचे शरीर काळे निळे पडलेले होते. त्यावरून अनिकेत जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून आणि नंतर गळा दाबून अत्यंत निघृणपणे खुन केल्याचे पोलिसांना सांगितले.

फोन आला आणि तिथेच घात झाला

खानवडी जवळील गायरानात दोघे बोलत असताना नीलमला कोणाचा तरी फोन आला. तसेच फोनवर ती हसत बोलत असल्याचे पाहून तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिथेच मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघेही लोकवस्तीपासून लांब असल्याने तिचा आवाज बाहेर गेला नाही. आरोपीने तिच्या पाठीत व छातीत हाताच्या कोपराने जोरात मारहाण करत गळा आवळून निर्दयीपणे खून केला. याबाबत भोर उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा

दरम्यान आरोपी अनिकेत जाधव हा एक ढाबा चालक असून, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याच्यावर यापूर्वी मोबाईल चोरीच्या प्रकरणात यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो त्यामध्ये येरवडा जेलमध्ये अटकही होता. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात त्याच्यासह त्याच्या आई-वडिलावरही गुन्हा दाखल आहे. यामध्ये त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.

Web Title: A shocking incident has taken place in saswad where a boyfriend murdered his girlfriend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी
1

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप
2

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला
3

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली
4

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.