Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Patas Murder Case : लोखंडी पाईप डोक्यात घालून हॉटेल मालकाचा खून; कारण काय तर…

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गात असलेल्या हॉटेल सह्याद्रीच्या शेजारी असलेल्या हॉटेल अमृत गार्डन मध्ये घरगुती कारणावरून झालेल्या वादातून हॉटेल मालकाचा लोखंडी पाईप डोक्यात घालून निघृणपणे खून केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 16, 2026 | 01:09 PM
लोखंडी पाईप डोक्यात घालून हॉटेल मालकाचा खून; कारण काय तर...

लोखंडी पाईप डोक्यात घालून हॉटेल मालकाचा खून; कारण काय तर...

Follow Us
Follow Us:

पाटस : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गात असलेल्या हॉटेल सह्याद्रीच्या शेजारी असलेल्या हॉटेल अमृत गार्डन मध्ये घरगुती कारणावरून झालेल्या वादातून हॉटेल मालकाचा लोखंडी पाईप डोक्यात घालून निघृणपणे खून केल्याची घटना घडली आहे.

 

या प्रकरणी पाटस पोलिसांनी संशयित आरोपी अशरफ अस्लम शेख ( वय २४ मुळ रा. सदर बाजार, सातारा, सध्या रा. हॉटेल सहयाद्री जवळ पाटस ता. दौड जि.पुणे.) याला ताब्यात घेतले आहे. विश्वास बबन उघडे ( वय अंदाजे ३१, रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. १४) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अमृत गार्डन हॉटेलमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गालगत मस्तानी तलावा शेजारी असलेल्या हॉटेल शेजारी असलेले अमृत गार्डन हॉटेलचे मालक विश्वास उघडे हे झोपेत असताना आरोपींनी घरगुती कारणातून झालेल्या वादाचा राग मनात धरून त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करुन खून केला. याबाबत सारिका सचिन गपाट ( सध्या रा. पाटील वस्ती, केसनंद, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा.इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे हे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सांगली हादरली! २४ तासांत तिहेरी हत्याकांड; दिवसाढवळ्या रक्तस्नानाने भीतीचे सावट

पाटसमधील टोलनाक्यावर कोयता गॅंगची दहशत

पुणे– सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस येथील टोलनाक्यावर चार-पाच जणांच्या टोळीने कोयत्यांनी टोल नाक्याची तोडफोड करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक टोल कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाटस पोलिसांनी तीन जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले असून, दोन जण फरार झाले आहेत. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर सोमवारी ( दि. १३) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या आसपास टोल नाक्यावर लेन क्रमांक चार वर एक चार चाकी स्विफ्ट कार आली. या कार मधून चार-पाच जण हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन खाली उतरत थेट त्यांनी टोल नाक्यावर हल्ला केला. कोयत्याने टोलनाक्याच्या काचा फोडल्या, टोल कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही तोडफोड करून लेनवर पुढे जाऊन परत वळून पुन्हा टोलवर कोयत्याने हल्ला चढवत तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या हल्ल्यात एका टोल कर्मचाऱ्याच्या हातावर कोयत्याचा वार बसल्याने तो किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. अचानक गाडीतून चार-पाच जण उतरतात आणि थेट कोयत्यांनी हल्ला चढवतात. या घटनेमुळे टोल नाक्यावर काही काळ महामार्गावरुन प्रवास करणारे वाहन चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: A shocking incident has taken place in which a hotel owner was murdered by putting an iron pipe in his head

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case
  • Patas News

संबंधित बातम्या

पत्नीला मित्रासोबत पाहिले अन् पतीलाच बसला चोप, पुण्यातील घटना; नेमकं काय घडलं?
1

पत्नीला मित्रासोबत पाहिले अन् पतीलाच बसला चोप, पुण्यातील घटना; नेमकं काय घडलं?

दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई
2

दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
3

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

लोणावळा ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी उघड, 8.5 किलो गांजा जप्त; तरुणाला ठोकल्या बेड्या
4

लोणावळा ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी उघड, 8.5 किलो गांजा जप्त; तरुणाला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.