Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर हादरलं! रॅप साँगच्या वादातून तरुणाचा निघृण खून; चाकू अन् सिमेंटच्या गट्ट्याने संपवलं

रॅप साँग कोण चांगले म्हणतो, या कारणावरून झालेल्या वादातून राजीवनगर रेल्वे स्टेशन परिसरात १० जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा चाकू, वीट, सिमेंटचा गट्टा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2026 | 02:01 PM
संभाजीनगर हादरलं! रॅप साँगच्या वादातून तरुणाचा निघृण खून; चाकू अन् सिमेंटच्या गट्ट्याने संपवलं

संभाजीनगर हादरलं! रॅप साँगच्या वादातून तरुणाचा निघृण खून; चाकू अन् सिमेंटच्या गट्ट्याने संपवलं

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : रॅप साँग कोण चांगले म्हणतो, या कारणावरून झालेल्या वादातून राजीवनगर रेल्वे स्टेशन परिसरात १० जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा चाकू, वीट, सिमेंटचा गट्टा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला आहे. त्याच्या मामेभावावरही चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री ११ ते रविवारी मध्यरात्री १२.४५ वाजेदरम्यान घडली आहे. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सहा तासांत नऊ आरोपींना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

 

शेखर उर्फ पिया देवीदास लहाने (२०, रा. इटखेडा) असे मृत तरुणाचे, तर श्रीजत राजू आदमाने असे जखमीचे नाव आहे. मंगेश गायकवाड, अजय उर्फ कमलेश भुतकर, अविनाश बोर्डे, संतोष जाधव, इम्रान पठाण, अनिरुद्ध आराख, रोहित गायकवाड, दीपक हिवाळे, मंगेश उगले यांच्यासह एकावर गुन्हा दाखल केला. शेखर उर्फ पिया देवीदास लहाने (वय २०) असे मृताचे तर श्रीजत राजू आदमाने (२०, दोघे रा. इटखेडा) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.

शेखर, श्रीजत आणि त्यांचा मित्र प्रथमेश उर्फ बटी जंगले हे मुंबईहून आलेल्या मित्राला भेटण्यासाठी राजीवनगर येथे गेले होते. तेथे मंगेश गायकवाडने त्यांची इतर आरोपींशी ओळख करून दिली. त्यानंतर सर्वजण अनिरुद्ध आराख यांच्या राजुनगर येथील रिकाम्या घरात मद्यपानासाठी बसले. याचवेळी रॅप साँगवरून श्रीजत आणि अनिरुद्ध यांच्यात वाद झाला. मद्यपान सुरू असतानाच रॅप साँग कोण चांगले म्हणतो, यावरून श्रीजत आदमाने आणि अनिरुद्ध आराख यांच्यात वाद झाला. त्यानंतर सर्वजण भांडतच घराबाहेर पडले आणि राजीवनगर रेल्वे पुलाखाली रस्त्यावर आले.

शेखरचा मृतदेह पाहून प्रथमेश जंगले भीतीने पळाला

त्यानंतर इम्रान पठाण याने कमरेला लावलेला चाकू काढून, तुम हमारे इधर आकर ज्यादा मस्ती कर रहे हो क्या, अब तुमको खल्लास करता हूं, अशी धमकी देत श्रीजतवर वार केला. त्याने हात आडवा केल्याने दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. पावसामुळे तो खाली पडताच मंगेश गायकवाड, अजय भुतकर, अविनाश बोर्डे व संतोष जाधव यांनी हातातील कडे, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. श्रीजतला वाचविण्यासाठी धावलेल्या शेखरवर आरोपींनी हल्ला चढविला. अविनाश बोर्डे याने चाकूने वार केला, तर मंगेश गायकवाड व अजय भुतकर यांनी वीट आणि सिमेंटच्या गट्टयाने डोक्यावर प्रहार केले. इतर आरोपींनीही मारहाण केल्याने शेखर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. प्रथमेश जंगले भीतीने तेथून पळून गेला.

हे सुद्धा वाचा : प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

शेखरचा मृत्यू; गुन्हा दाखल

घाबरलेल्या श्रीजतने घटनास्थळावरून पळ काढला. रविवारी सकाळी शेखरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो नातेवाईकांसह वेदांतनगर ठाण्यात पोहोचला. गंभीर जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केलेल्या शेखरचा पहाटे २.५५ वाजता मृत्यू झाला.

Web Title: A shocking incident involving the brutal murder of a young man has occurred in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार
1

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
2

आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Madhya Pradesh : “बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं”, लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी
3

Madhya Pradesh : “बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं”, लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?
4

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.