Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime : ऊसतोड उचलीच्या पैशांवरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण; धाराशिव तालुक्यातील घटनेनं खळबळ

उसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून १६ वर्षीय मुलाला मारहाण करून बळजबरीने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील पळसप येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 27, 2026 | 02:36 PM
ऊसतोड उचलीच्या पैशांवरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण; धाराशिव तालुक्यातील घटनेनं खळबळ

ऊसतोड उचलीच्या पैशांवरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण; धाराशिव तालुक्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:

धाराशिव : राज्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. दररोज गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून १६ वर्षीय मुलाला मारहाण करून बळजबरीने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील पळसप येथे घडली आहे. या प्रकरणी उसतोड मुकादमासह चौघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील पारेकर (मुकादम), दिलीप गोविंद काळे, मच्छिंद्र गोविंद काळे आणि अर्चनाबाई दिलीप काळे यांनी ४ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पळसप येथील सचिन सुनील काळे याला अडविले. उसतोडीच्या उचलीचे पैसे परत द्या, अन्यथा कामावर या, अशी मागणी करत आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा : कल्याणमध्ये चाललंय तरी काय? मद्यधुंद तरुणाचा चक्क पोलिसांवर हल्ला, घटना CCTVमध्ये कैद

मजुरांची सुरक्षा धोक्यात

या नंतर सचिनला त्याच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने सोबत घेऊन जात उचलीचे पैसे दिल्यानंतरच मुलाला सोडू, अन्यथा तो आमच्याकडेच राहील, अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर सचिनची आई कौशल्या सुनील काळे (वय ३५, रा. पळसप) यांनी २४ जुलै रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे उसतोड मजुरांच्या उचलीच्या व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उचलीच्या पैशांवरून मजुरांवर दबाव टाकणे किंवा धमकावण्याच्या घटना अधूनमधून समोर येत असून, या प्रकरणामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण

इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते १७ जुलैदरम्यान घडला आहे. बेगमपुरा पोलिसांनी तपास करुन आरोपीला नेवासा (जि. अहिल्यानगर) येथून बेड्या ठोकल्या आहेत. राजू माळी असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: A shocking incident involving the kidnapping of a 16 year old boy has occurred in dharashiv taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • crime news
  • Farmers
  • Kidnapping news

संबंधित बातम्या

Latur Crime : बनावट मद्यनिर्मिती रॅकेट उद्ध्वस्त, 8 आरोपींना ठोकल्या बेड्या; तब्बल…
1

Latur Crime : बनावट मद्यनिर्मिती रॅकेट उद्ध्वस्त, 8 आरोपींना ठोकल्या बेड्या; तब्बल…

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या
2

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या

पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्…; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
3

पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्…; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय
4

गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.