Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण…

छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौक परिसरात गुरुवारी पहाटे ४७ वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने मांडीवर वार करून खून केला आहे. जिन्सी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2026 | 12:19 PM
संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण...

संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौक परिसरात गुरुवारी पहाटे ४७ वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने मांडीवर वार करून खून केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी धावत आलेल्या व्यावसायिकाला पोलिसांनी घाटीत दाखल केले; मात्र अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, हल्ल्यामागील नेमके कारण क्षुल्लक वाद होते की लुटीचा प्रयत्न, याचा जिन्सी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

 

या प्रकरणात रात्री उशिरा दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची उशीरापर्यंत चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कैसर कॉलनी येथील अब्दुल बासित हकीम खान (वय ४७) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. ते स्क्रॅपचा व्यवसाय करीत होते. या प्रकरणी त्यांचे भाऊ वाजेद हकीम खान (वय ३८, रा. फातेमानगर, हसूल) यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते इलेक्ट्रशियन म्हणून काम करतात. गुरुवारी पहाटे अब्दुल यांच्या मुलाने फोन करून एका रिक्षाचालकाकडून वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. तातडीने घाटी रुग्णालय गाठले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच अब्दुल यांना मृत घोषित केले.

प्राथमिक तपासानुसार, पहाटे तीनच्या सुमारास आकाशवाणी चौकातील पंचम बार परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीने अब्दुल यांच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत त्यांनी मदतीसाठी धाव घेण्याचा प्रयत्न केला; मात्र काही अंतरावरच ते रस्त्यावर कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे, निरीक्षक गणेश ताठे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. विविध पथकांकडून परिसरातील पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अब्दुल बासित पंचम बारजवळील झाडाच्या दिशेने जाताना दिसतात. तेथे आधीपासून दोन तरुण उभे असल्याचे दिसून आले असून, त्यातील एका तरुणाच्या पाठीवर बॅग होती. काही मिनिटांनंतर अब्दुल हे जालना रोडच्या दिशेने धावताना दिसतात. त्याआधी काही क्षण त्यांच्यात वाद झाल्याचे दिसून येत असून, त्याचवेळी मांडीवर धारदार शस्त्राने वार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जखमी अवस्थेत अब्दुल यांनी हातवारे करून मदतीची विनंती केली. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने वाहन थांबविले. मात्र अब्दुल रस्त्यावर कोसळल्याने तो घाबरला आणि त्याने तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

मुलाला बसस्थानकावर बोलावले, पण…

घटनेच्या सुमारे तासभर आधी अब्दुल यांनी मोठा मुलगा अरफात याला फोन करून बसस्थानकावर घेण्यासाठी येण्यास सांगितले होते. मात्र दुचाकीत पेट्रोल नसल्याचे मुलाने सांगितल्यावर मीच येतो, असे सांगून त्यांनी फोन ठेवला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. ते नेमके कुठून परतत होते आणि कोणाला भेटण्यासाठी गेले होते, याचा तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

खिशातील पैसे सुरक्षित; मोबाईलचा शोध

पंचनाम्यात मृताच्या खिशात ५०० रुपये सुरक्षित आढळले. मात्र त्यांचा मोबाईल गायब होता. त्यामुळे मोबाइल हिसकावण्याच्या उद्देशाने हल्ला झाला का, या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. मोबाइलचे लोकेशन, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे. अब्दुल बासित यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Web Title: A shocking incident involving the murder of a businessman has occurred in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
1

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

Crime News : महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
2

Crime News : महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड
3

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम
4

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.