Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी (दि. ७ जून) सकाळी करंजाळे गावाजवळ भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 09, 2026 | 02:48 PM
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

ओतूर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी (दि. ७ जून) सकाळी करंजाळे गावाजवळ भीषण अपघात घडला आहे. हॉटेल छत्रपतीसमोरील धोकादायक वळणावर पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एका ४० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रामदास दशरथ घोगरे (वय ४०, रा. खानगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ केए ४३७७ क्रमांकाचे पिकअप वाहन महामार्गावरून जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेले हे भरधाव पिकअप वाहन समोरून येणाऱ्या एमएच १४ ईजे ७८६३ क्रमांकाच्या दुचाकीवर थेट जाऊन आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकीस्वार रामदास घोगरे हे दुचाकीसह सुमारे ५० फूट अंतरापर्यंत फरफटत गेले. या जोरदार धडकेनंतर पिकअप वाहनही रस्त्यावर पलटी झाले.

अपघाताचा मोठा आवाज होताच करंजाळे परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेतील घोगरे यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जुन्नर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : संतापजनक! आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय पुतणीवर चुलत्याचाच अत्याचार; आरोपी फरार

गतिरोधक, इशारा फलक, रिफ्लेक्टर्स बसविण्याची मागणी

करंजाळे परिसरातील हॉटेल छत्रपतीसमोरील हे वळण अत्यंत धोकादायक बनले असून येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना येथे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, “प्रशासनाने आतातरी जागे व्हावे आणि या धोकादायक वळणावर तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स), इशारा फलक, रिफ्लेक्टर्स आणि वेगनियंत्रण यंत्रणा बसवावी,” अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : वाहतूक पोलिसामुळे तरुण गंभीर जखमी; दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली

Web Title: A shocking incident of a serious accident has taken place on the kalyan ahilyanagar highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ
1

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून…
2

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून…

वाहतूक पोलिसामुळे तरुण गंभीर जखमी; दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली
3

वाहतूक पोलिसामुळे तरुण गंभीर जखमी; दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली

पुण्याच्या वेशीवर ‘हाऊस पार्टी’चे नवे जाळे; शहरातील कारवाईनंतर ग्रामीणमधील फार्महाऊस, रिसॉर्ट्सवर वाढला कल
4

पुण्याच्या वेशीवर ‘हाऊस पार्टी’चे नवे जाळे; शहरातील कारवाईनंतर ग्रामीणमधील फार्महाऊस, रिसॉर्ट्सवर वाढला कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.