Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव क्रूजरच टायर फुटलं अन्…; पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात

लोणी देवकर परिसरात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात होऊन क्रूजर जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 17, 2026 | 01:10 PM
भरधाव क्रूजरच टायर फुटलं अन्…; पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात
Follow Us
Follow Us:

इंदापूर : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अनेक जणांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी देवकर परिसरात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात होऊन क्रूजर जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. टायर फुटल्याने जीप रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.१४ एल. बी.१६१३ क्रमांकाची क्रूजर जीप लोणी देवकर एमआयडीसीकडे जात असताना सकाळी ९ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक तिचा टायर फुटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या एम.एच.१२ वाय क्यू.६६०३ क्रमांकाच्या ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण धडकेत जीपचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला.

अपघात इतका गंभीर होता की चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रमोद बाळासो खवळे (वय २८, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), शशांक कोटिया (वय ३२, रा. गौतमनगर, गिरड, ग्वालियर, मध्य प्रदेश) आणि विजयसिंह राजपूत (वय ३५, रा. त्रीलोकनगर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. हे तिघेही लोणी देवकर एमआयडीसीमधील खासगी कंपनीत कार्यरत होते.

घटनेची माहिती मिळताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, सहायक फौजदार बालगुडे, जगदाळे यांच्यासह पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : टेस्ट ड्राईव्ह पडली महागात! 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली Tata Sierra; आता नुकसान भरपाई कोण देणार?

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील धक्कादायक घटना

शुक्रवारी पहाटे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रक एका वाहनावर आदळून ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात ट्रकमधील दोन क्लिनर जखमी झाले आहेत. नासीर मोहम्मद शाह मोहम्मद चौधरी (वय ३६, सध्या रा. कुदळवाडी, मोशी रस्ता, चिखली, मूळ रा. कलवारीनानकार, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. अपघातात ट्रकमधील मदतनीस अर्जुनकुमार मौर्या (वय २४, सध्या रा. मोरे चौक, अशोक काॅलनी, चिखली) याच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे. याबाबत मौर्या याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: A shocking incident of a serious accident has taken place on the pune solapur highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
2

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर
3

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.