Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lonavala Crime : लोणावळ्यात पर्यटकांवर हल्ला; बेदम मारहाण करुन एकाचा खून

पावसाळा सुरू झाल्यानंतर लोणावळ्यात पर्यटाकांची गर्दी होत असतानाच वाहन वळविण्यावरून झालेल्या वादातून एका एका पर्यटकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 27, 2025 | 07:12 PM
Crime News

Crime News

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर लोणावळ्यात पर्यटाकांची गर्दी होत असतानाच वाहन वळविण्यावरून झालेल्या वादातून एका एका पर्यटकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (२५ मे) रात्री लोणावळ्याजवळील कार्ला फाट्याजवळील दहिवली गावातील फार्महाऊसजवळ घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटकदेखील केली आहे.

कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. आडूर कोंडकरूल, गुहागर, रत्नागिरी) असे खून झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. मनोज मधुकर वरवटकर (वय ४२), प्रज्वल उदय मेहता (वय २६) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. ते पर्यटनासाठी आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी कमलेश व त्यांचे काही मित्र लोणावळ्यात आलेले होते. सायंकाळी कार्ला फाटा परिसरातील दहिवली गावाजवळ वाहन वळविण्यावरून पर्यटक व स्थानिक तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. वादातून हाणामारी झाली. स्थानिकांनी लोखंडी गज, दांडके, कारच्या वायपरनी पर्यटकांवर हल्ला केला. हल्ल्यात कमलेश धोपावकर यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात नेले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघे पर्यटक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मनोज वरवटकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी निकेश कांबिरे (रा. कर्जत, रायगड), प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (दोघे रा. वेहेरगाव, मावळ), गौरव संजय पट्टाधारी (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांच्यासह अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत आवारे तपास करत आहेत.

Web Title: A shocking incident of a tourist being murdered in lonavala has taken place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Lonavala news
  • Lonavla
  • Murder

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई
1

Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई

अवैध शस्त्रांविरुद्ध नांदेडमध्ये मोठी कारवाई; ७ अग्निशस्त्रे, ७६ जिवंत काडतुसे जप्त; १७ आरोपी जेरबंद
2

अवैध शस्त्रांविरुद्ध नांदेडमध्ये मोठी कारवाई; ७ अग्निशस्त्रे, ७६ जिवंत काडतुसे जप्त; १७ आरोपी जेरबंद

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
3

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा
4

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.