Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल

बिबवेवाडीतील अप्पर डेपो परिसरात रिक्षाचालक तरुणाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2026 | 07:30 PM
रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल

रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : बिबवेवाडीतील अप्पर डेपो परिसरात रिक्षाचालक तरुणाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शस्त्राच्या धाकाने तरुणाकडील मोबाईल, रोकड आणि रिक्षा घेऊन चोरटे पसार झाले आहेत. दोन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्याला बेदम मारहाण देखील केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात सिद्धेश्वर मुंढे (वय १९, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, चार अनळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण रिक्षा चालक असून, बिबवेवाडी तसेच आंबेगाव व कात्रज परिसरात प्रवासी रिक्षा चालवितो. दरम्यान, तो दोन दिवसांपुर्वी दुपारी अप्पर डेपो येथून जात होता. तेव्हा दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी गुरू गौतममुनी हॉस्पीटलसमोर दुचाकी आडव्या लावून तरुणाची रिक्षा अडविली. त्याला जबरदस्तीने बाहेर काढून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर शस्त्राच्या धाकाने त्याचा मोबाईल व रोकड काढून घेतली. त्याला ऑनलाईन बॅकिंगचा पासवर्ड मागितला. पण तरुणाने तो देण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा बेदम मारहाण केली. तसेच, त्याची रिक्षा घेऊन पोबारा केला. अधिक तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

कानिफनाथ मंदिराजवळ तरुणांना मारहाण करून लुटले

कानिफनाथ मंदिराजवळ सिटी व्हिव पाँईट भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी तीन तरुणांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल, रोकड तसेच ऑनलाईन रक्कम घेऊन लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फुरसूंगी पोलिस ठाण्यात २१ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण दापोडी परिसरातील आहे. तो आणि त्याचे मित्र दुचाकीने कानिफनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून ते सिटी व्हिव पाँईटला येथून परतत होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यांना हाताने व दगडाने मारहाण सुरू केली. त्यांना धमकावले. तर एका तरुणाकडील दोन मोबाईल तसेच ऑनलाईन रक्कम ट्रान्सफरकरून त्यांना लुटले. हा प्रकार दुपारी साडे चारच्या सुमारास घडला असून, अधिक तपास फुरसूंगी पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : अन्न भेसळविरोधी कारवाईची धास्ती, पनीरसह भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ गायब; खुले खाद्यतेलही बाजारातून गायब

Web Title: A shocking incident of a young rickshaw driver being robbed has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.