Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चाललंय तरी काय? स्वारगेट परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कारण काय तर…

स्वारगेट परिसरात किरकोळ कारणावरुन तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीनांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 06:17 PM
आईला शिवी दिल्याने तरुणाला आला राग; दगडाने ठेचून केली हत्या

आईला शिवी दिल्याने तरुणाला आला राग; दगडाने ठेचून केली हत्या

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज गंभीर घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वारगेट परिसरात किरकोळ कारणावरुन तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीनांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या हल्यात प्रसाद मारुती माने (वय ३७, सध्या राहणार राही रेसीन्डसी, नऱ्हे रस्ता, धायरी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीनांसह पाच जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माने यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, माने हे मंगळवारी (५ मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास बाहेरगावाहून स्वारगेट भागात आले होते. ते स्वारगेट परिसरातील पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. आरोपींकडे माने यांनी पाहिले. आमच्याकडे का पाहिले ? अशी विचारणा करुन आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

हे सुद्धा वाचा : तळबीड परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई, दोन परराज्यातील महिलांची सुटका

कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून

धायरी येथील रायकर मळा भागात कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. सासऱ्याने सुनेचे डोके भिंतीवर आपटून तसेच दगडाने मारहाण करून तिचा खून केला आणि घराला कुलूप लावून सासरा पसार झाला आहे. पोलिस पसार झालेल्या सासऱ्याचा शोध घेत असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वाती तेजस चौधरी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासरे भानुदास भास्कर चौधरी यांच्यावर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुटूंबियांनी तक्रार दाखल केली आहे. स्वाती चौधरी यांचे पती तेजस चौधरी हे शिवाजीनगर न्यायालयात क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ते न्यायालयात गेले होते. त्यामुळे घरी सहा महिन्याच्या बाळासह स्वाती आणि तिचे सासरे होते. स्वाती आणि त्यांचे सासरे भानुदास चौधरी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यादरम्यान स्वाती या बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या असता भानुदास चौधरी तेथे गेले. त्यांनी स्वाती यांचे डोके भिंतीवर आपटले आणि कपडे धुण्याच्या दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला. नंतर आरोपीने घराला कुलूप लावून पळ काढला.

Web Title: A shocking incident of an attack on a young man has taken place in the swargate area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
1

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
2

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार
3

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार

पुण्यात ‘खाकी’ला डाग! गेल्या 7 वर्षात 333 पोलिसांचे निलंबन; तर ‘इतक्या’ जणांवर बडतर्फीची कारवाई
4

पुण्यात ‘खाकी’ला डाग! गेल्या 7 वर्षात 333 पोलिसांचे निलंबन; तर ‘इतक्या’ जणांवर बडतर्फीची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.